सिरोंचा, जत आणि जिवती — महाराष्ट्राचा सिमावाद
सिरोंचा, जत आणि जिवती — महाराष्ट्राचा सिमावाद
Sironcha, Jat and Jivati — Simaism of Maharashtra
कर्नाटक karnatak सिमेवरील महाराष्ट्रातील maharashtra जत तालुक्यातील 41 गावांनी महाराष्ट्र सरकार पाण्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्यांने दखल घेत नसल्यांचे कारण देत, गावे कर्नाटक राज्यात सामील करावी असा ग्रामसभेनी ठराव मंजूर केला. या ठरावावरून, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई cm karnataka यांनी या ठराव घेणार्या ग्राम सभेसोबत राहण्यांचे जाहीर करताच, राज्यात राजकीय कल्लोळ माजला आहे.
महाराष्ट्र राज्यांची भाषावार प्रांतरचना झाल्यानंतर, मराठी भाषिकांचा संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला. मात्र मराठी बोलणारा बेळगांव जिल्हयातील बेळगांव, belgao निप्पानी, खानापूर, नंदगाळ आणि कारवार क्षेत्र कर्नाटक राज्यात जोडल्या गेले. तेव्हापासून बेळगांव जिल्हा कर्नाटक राज्यातून वगळून महाराष्ट्रात जोडावे यासाठी संघर्ष सुरू आहे. हाच सीमा वाद म्हणूनही ओळखल्या जाते. हा वाद राजकीय आहे, तसाच तो सुप्रिम कोर्टात supreme court असल्यांने, कायदेशीर वादही आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोनही राज्यात भाजपा सरकार असल्यांने या वादाला आणखी फोडणी दिल्या जात आहे. त्यातच जत jat तालुक्यातील ग्रामसभेने कर्नाटक राज्यात सहभागी होण्यांचा ठराव मंजूर केल्यांने, महाराष्ट्र सरकाराची निश्चितच नाचक्की झाली आहे.
आपल्यावर आपलेच राज्य अन्याय करीत असल्यांने, आपल्याला दुसर्या राज्यात सहभागी करावे अशी मागणी करण्यांची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही महाराष्ट्रात अशाच एका मागणीने लक्ष वेधून घेतले होते, ती म्हणजे, आम्हाला आंध्र प्रदेशात सामील करून घ्या!
सिरोंचाची होती मागणी
1997 मध्ये सिरोंचा sironcha येथील नागरीकांनी, 'सिरोंचा तालुका आंध्र प्रदेशाला AP जोडा' या मागणीकरीता सिरोंचा बंदचे आंदोलन केले होते. या मागणी मागे तेव्हाचे लोकसत्ताचे तेथील प्रतिनिधी आणि आताचे आयबीएन लोकमतचे महेश तिवारी यांचा मोठा वाटा होता. या आंदोलनामुळे राज्यात खळबळ माजली, शासन दरबारी आंदोलनाची नोंद झाली, मात्र पुढे सिरोंचााला न्याय मात्र मिळाला नाही. जत तालुक्यातील गावांनी कर्नाटक राज्यात सामील करून घेण्याबाबत घेतलेल्या ग्राम सभेच्या ठरावाने सिरोंचाची मागणी ताजी झाली.
सिरोंचा हा तालुक्यात राज्यातील शेवटचा तालुका. राज्याच्या राजधानीपासून 1500 कि.मी. अंतरावरील हा तालुका केवळ राजकीय नकाशात तेवढा महाराष्ट्रात आहे. भौगालीक नकाशात तो महाराष्ट्रात दिसतो. मात्र महाराष्ट्र सरकारला हा तालुका आपल्याच राज्यात आहे असे वाटतो काय? अगदी जिल्ह्याचे मुख्यालयातही जाण्यासाठी चार तास लागतात. जिल्हयाचे मुख्यालयी जावून शासकीय कामे करण्यासाठी तीन दिवसाचा वेळ काढावा लागतो. त्या तुलनतेच तीन—चार तासात आंध्र प्रदेशाची राजधानी हैद्राबाद hyedrabad येथे जाणे सिरोंचा वासीयांना सोयीचे जाते. जिल्हयाचे मुख्यालय 15 मिनीटाचे अंतरात आहे, त्यामुळेच सिरोंचाचा संपूर्ण सामाजीक आणि सांस्कृतीक कार्य आंध्र प्रदेश म्हणजे आताचे तेलंगाणाशी TS निगडीत आहे.
सिमावादाचा प्रश्न केवळ जत तालुका किंवा सिरोंचा तालुकाच नाही, अगदी जिवती Jiwati तालुक्यातही हा वाद पहायला मिळतो. जिवतील तालुक्यातील साडेबारा गावे अजूनही सिमावादात अडकून आहेत. महाराष्ट्र सरकारनी या गावाबाबत सुप्रिम कोर्टातून केस जिंकून, या गावावर आपलाच हक्क असल्यांचे सांगत असले तरी, गावकरी मात्र आंध्र प्रदेशाचे सरकारी लाभ उचलत आहेत, आंध्र सरकारने त्या गावातील नागरीकांना रेशन, घरासह जमिनीही दिल्या आहेत. महाराष्ट्राचे सरकार मात्र आपल्याच नागरीकांना कोणत्याही सुविधा न देता, केवळ भौगोलीक नकाशानुसार 'आपले नागरीक' म्हणवून घेत आहे.
मुंबई अशी का वागते?
अनेकांना मुंबई Mumbai म्हणजे महाराष्ट्र वाटतो. ठाणे, नाशिक, पुणे, मुंबईच्या पलिकडेही महाराष्ट्र आहें, असे राज्यकर्त्याना वाटतच नाही. अगदी विदर्भाबाबत बोलायचे झाले तर, विदर्भ vidarbha म्हणजे मुंबईत राज्य करणार्या राज्यकर्त्याची 'वसाहत' आहे काय? याच अविर्भावात वागते. अशी वागण्यातूनच कधी 'सिरोंचा'चा तर कर 'जत' चा प्रश्न निर्माण होतो. आपल्या राज्यात सामील असलेल्या महाराष्ट्रीयांना न्याय न देता, इतर राज्यातील नागरीकांना महाराष्ट्रात सहभागी करून घेण्यांचे केवळ भावनीक राजकारण थांबणार नाही काय?
विजय सिध्दावार
9422910167



महाराष्ट्राच्या चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील अनुक्रमे सिरोंचा -जिवती हे तालुके म्हटले तर दुर्लक्षित.सिरोंचा तालुक्यातील व्यापार उदीम अद्यापही तेल॔गणाशी (पूर्वीचा आंध्र) आहे.आता पुल झाले .हे तालुके तेलंगणा- छत्तीसगड शी जोडले गेले.अधिक सोयीस्कर झाले.गेल्या दोन वर्षांपासून सिरोंचा-गडचिरोली राज्य महामार्ग अत्यंत खराब झाला आहे.सर्व वाहतूक आदिलाबाद मार्गे होत आहे.खुद्द स्थानिक खासदार ही आदिलाबाद मार्गे अनेकदा गेले. जिल्ह्यातील कामासाठी तेथील नागरिकांना नाहक भुर्दंड पडतोय.एसटी महामंडळाच्या बसेस चे हाल कुत्रे खात नाही.अख्खी मारोती 800 जाईल एवढे मोठ्ठे खड्डे आहेत. पण मुंबईत बसलेल्या तथाकथित सहानुभूतीदारांना अद्याप जाग आली नाही.आम्ही गडचिरोलीचे पालक म्हणून मिरवतात मात्र.मग तेथील लोकांनी तेलंगणात जावू द्या म्हटले तर काय चुकले.गेल्या कित्येक वर्षांपासून *अहेरी* जिल्हा करा अशी मागणी आहे.तिकडे जिवती मधील साडेबारा गाव कायद्याने महाराष्ट्रातील झाली असेल पण अद्यापही आताचे तेलंगण शासन आपल्या योजना राबवते. तेव्हाच्या आंध्र शासनाने रस्ते, घरे,शेतीविषयक लाभ,पाणी उपलब्ध करून दिले.महाराष्ट्र शासनानेही योजना राबवल्या पण आंध्र जास्तच तत्पर. महाराष्ट्र शासनापूर्वी आंध्र ने सिंगल फेज विज उपलब्ध करून दिली होती. यासाठी पुन्हा एक किस्सा सांगणे उद्बोधक ठरेल.अगदी टोकावर असलेले शंकरलोधी गाव आहे.चंद्रपूर जिल्हा परिषदेने तेथे 2007मध्ये गावाला पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जलस्वराज्य योजनेत 'पाणी पुरवठा योजना' आखली. पण जिल्ह्यातील.पण.च्या पाणी पुरवठा विभागाला स्त्रोत मिळेना. म्हणून एकदा पाहण्यासाठी गेलो. ह्या शंकरलोधीला जाणे म्हणजे दिव्यच! आता रस्ता झाला आहे म्हणतात.आम्ही पाणी पुरवठा इंजिनीअर घेवून गेलो. त्याने सांगीतले...'येथे बोर मारले..तेथे बोर मारले पण पाणी नाही. '
उत्तर द्याहटवाआश्चर्य म्हणजे आंध्र शासनाने तेथे एक बोर करून धो धो वाहणारे नळ ही लावून दिले.पण आमच्या इंजिनीअर ला पाणी नाही मिळाले.हे अद्भूत दृश्य पाहायला मिळाले.हे कसे विचारले. तेव्हा सोबतचा इंजिनीअर तोंडात बोटे घालून गप्प! यामुळे शंकरलोधीमधील चंद्रपूर जि.प.ची योजना रद्द करण्यात आली.यासाठी रुपये वाया गेले ते गेले.अशा त-हेने तेथील गावात आंध्र ने यशस्वीपणे पाणी उपलब्ध करुन दिले.त्यामुळेच लोक म्हणतात आंध्र-आता तेलंगणात जावू द्या. या गावापासून तेलंगणाचा उतनूर तालुका हाकेच्या अंतरावर आहे.या गावांना तत्कालीन वित्त आयोगाचे अध्यक्ष जे.पी.डांगे व आताचे राष्ट्रवादी चे राज्य अध्यक्ष जयंतराव पाटील हयांनीही भेटी दिल्या आहेत.पण अधेमधे लोक आम्हाला तिकडे जावू द्या अशी हाकाटी देतातच. याचे रहस्य काय ?
सिरोचा-जिवती या दोन तालुक्यात जिल्हाधिकारी व जि. प.चे सीईओ अपवादानेच भेट देतात. आता अलिकडे तर ए.सी त बसून कागद हालवा संस्कृती बळावली. अगदी बीडीओ तहसिलदार ही जात नाही..
प्रभू राजगडकर