नवभारत विद्यालयात येथे जात पडताळणी शिबीर



मूल (प्रतिनिधि)
स्थानिक नवभारत विद्यालयात जात पडताळणी शिबिराचे आयोजन करण्यात आले समाज कल्याण विभाग चंद्रपूरच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले जात पडताळणी विभागाचे उपायुक्त विजय वाकुडकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी वाकुडकर यांनी समाज कल्याण विभागाच्या विविध योजना समजावून सांगितल्या. जात पडताळणी करिता आवश्यक असलेले कागदपत्रांची माहिती दिली. विद्यार्थ्यांना भेडसावत असलेल्या प्रश्नांचे निरासनही त्यांनी केले. जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द होऊ नये यासाठी काय दक्षता घ्यावी याची माहिती दिली.
यावेळी प्रफुल पारेलीवार, उपेंद्र वनकर,प्राचार्य अशोक झाडे यांचे सह शिक्षक प्राध्यापक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!