कृषी अधिकाऱ्याच्या अभयामुळे बोगस औषधाची विक्री

कृषी अधिकाऱ्याच्या अभयामुळे बोगस औषधाची विक्री         


मूल :  तालुक्यातील टेकाडी येथील शेतकरी मारोती शेंडे यांच्या शेतातील पराटी  चे रोप औषध फवारणीने ७० टक्के नष्ट झाल्याची तक्रार तालुका कृषी अधिकारी पंचायत समिती मूल यांना देऊन आठ दहा दिवस झाले. मात्र अजूनही त्याची चौकशी करण्यात आली नाही. पावसाळ्याच्या सुरुवातीपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे  पेरणी पासून तर  सध्या स्थितीत शेतकरी हताश झालेला आहे. 
     अशा परिस्थितीत टेकाडी येथील गरीब शेतकरी मारोती शेंडे यांनी ०.७० हे. आर. जागेत आपल्या मालकी हक्काच्या शेतात पराटीची लागवड केली. रोपतट्याची उंची थोडी वाढली मात्र सोबत गवत वाढले, वाढलेले गवत नष्ट करण्यासाठी मूल येथील अनिल अँग्रो ट्रेडर्स मधून तेथील संचालकला विचारून ग्लायसिस नावाचे तणनाशक मागितले, त्यांनी तन मोठा झाला असेल तर त्याऐवजी दुसरं औषध न्या म्हणून युपीआय कंपनीचे स्वीप पाँवर नावाचे औषध दिले. सदर शेतकऱ्याने दिलेल्या औषधीची फवारणी केल्याने ७० टक्के पराटीची झाडे नष्ट झाली आणि गवत आहे तसेच असल्याची तक्रार त्याने   अनिल अँग्रो ट्रेडर्स चे संचालक यांचे कडे केली असता. त्याच काहीही ऐकून न घेता कंपनी ने पाठवले आम्ही विक्री करतो, आम्हाला काय माहीत म्हणून सांगितले, मारोती शेंडे या शेतकऱ्याने सदरची कैफियत मांडून ७० टक्के शेत पीक नष्ट झाल्याची तक्रार  पंचायत समितीचे कृषी अधिकारी यांचे कडे केली मात्र आठ दहा दिवस होऊनही कृषी अधिकारी याकडे लक्ष देत नाही. यामुळे पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्याचे कृषी केंद्रांशी साटेलोटे असल्याचे शेतकऱ्याचे मत आहे. 
    अशा केवळ शेतीच्या भरोश्यावर कुंटुंबाचे उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकऱ्यांनी कुणाकडे दाद मागायची असा सवालही  शेतकऱ्यांनी केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!