बसस्थानक व्यवस्थापकाला शिवसेनेचा घेराव
बसस्थानक व्यवस्थापकाला शिवसेनेचा घेराव
विद्यार्थ्यांचे समस्या घेऊन दिले निवेदन.
मागणी पूर्ण न झाल्यास शिवसेना स्टाइल ने आंदोलन.!!
मूल तालुक्यातील चांदापुर जुनासुर्ला गडीसुर्ला या क्षेत्रातील विद्यार्थी शालेय शिक्षण घेन्या करिता दररोज मूल येथे ये_जा करतात,परंतु बस्थांनक महामंडळ यांच्या ढसाळ नियोजना मूळे दररोज विद्यार्थाना नाहक त्रास सहन करावा लागत आहे,शाळा व विद्यालय हे दू..५-०० वाजता सूटत असल्यामुले वेळेवर बस मीळत नसल्यामुळे उशीरा रात्रिचे ८-००ते ९-०० वा पर्यंत विद्यार्थी घरी जातात,विद्यार्थी विद्यार्थिनी ये जा करताना वेळ जात असल्यामूळे मानसिक आणि शारीरिक त्रास होत असताना अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे, करीता विद्यार्थी विद्यार्थीनी शिवसेना तालुका समन्वयक याचेशी संपर्क साधला असता शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिर्हे यांचे मार्गदर्शनात शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार हे प्रभारी तालुका समन्वयक रवी शेरकी शहर प्रमुख मनोज मोहुर्ले, महेश चौधरी, युवा सेना शहर प्रमुख अमित आयलानी यांचे सोबत विद्यार्थीनी यांना घेऊन व्यवस्थापकाला घेराव टाकताच तात्काळ बस स्थानक व्यवस्थापक यांचेशी चर्चा करून मागणी पूर्ण केली, परंतु विद्यार्थ्यांच्या वेळेनुसार जादा बस देण्याची मागणी पूर्ण होत नाही तो पर्यंत शिवसेना शांत बसणार नाही, चंद्रपूर आगार व्यवस्थापक यांचे शी भ्रमणध्वनी द्वारे संपर्क करून समस्या मार्गी लवकरात लवकर लागणार अशे आश्वासन दिले.
या वेळी असंख्य शिवसेना युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!