बचतीचे पैसे गोळा न करता महिलांना सक्षम करणे या हेतूने सहयोगीचा पुढाकार
मूल (प्रतिनिधी)
मुल येथील सहयोगीनी नलिनी आडपवार हया बचत गटातील महिलासाठी कार्य करतात.बचत गटात नुसते पैसे गोळा करणे हा उद्देश न ठेवता महिलांचे सक्षमीकरण व्हावे यासाठी त्या नेहमी झटत असतात.विविध उपक्रम रा बवून महिलांना जागृत करतात.आज 10/10/2022 ला गुंजन व आनंदी बचत गटाच्या वर्धापन दिनानिमित्त त्यांनी चंद्रपूर येथे मातोश्री वृद्धाश्रम येथे भेट दिली .आयुष्यभर मुलांना सावली देणारे आई वडील , वृध्द झाले की नकोसे होतात.
ही शोकांतिका आहे.त्यांना भेटून महिलांनी फळं,बिस्कीट वितरण केले.सर्वांना गहिवरून आले.त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!