वाघाच्या हल्ल्यात वृद्ध शेतकरी ठार

वाघाच्या हल्ल्यात वृद्ध शेतकरी ठार


चिरोली (प्रतिनिधी)
आज सकाळी साडेसात वाजता चे दरम्यान पट्टेदार वाघाने हल्ला केल्याने वृद्ध शेतकरी जागीच ठार झाल्याची घटना घडली.
ही घटना चिरोली येथील असून मृतकाचे नाव ऐवनाथ चुनारकर वय ७५ वर्षे असे आहे.
ऐवनाथ चुनारकर हे शेती पाहण्यासाठी माठ नाल्या जवळ एकनाथ चुनारकर यांचे अतिक्रमित शेत आहे. या शेतात पाणी देण्याकरिता ते गेले असता, नियत क्षेत्र कक्ष क्रमांक 720 मध्ये  दबाव धरून बसलेल्या वाघाने ऐवनाथ वर हल्ला केला त्यात ते जागीच ठार झाले.
घटनास्थळी वन विभागाचे कर्मचारी आणि पोलीस पथक दाखल झाले असून पुढील तपास करीत आहे.
वारंवार वाघाच्या होणाऱ्या हल्ल्यामुळे शेतकरी नागरिक संतप्त झाले असून या वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!