संदीप आगडेवर मारहाणीचा गुन्हा दाखल

संदीप आगडेवर मारहाणीचा गुन्हा दाखल

याच तस्करीच्या व्हिडीओ मुळे मारहाण झाल्याचा आरोप


मूल येथील रेती कंत्राटदार संदीप आगडे यांनी 'आमच्या रेती तस्करीचे व्हिडीओ वायरल का केले?' असा आरोप करीत बेदम मारहाण केल्यांने मूल पोलिसांनी संदीप आगडे यांचे विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

संदीप आगडे हे  यावर्षी हळदी येथील रेतीघाटाचे कंत्राट घेतले होते.  या रेतीघाटावरून त्यांनी​ नियमबाह्य पध्दतीने रेतीचा उपसा केला होता. प्रशासनाच्या पाठबळाने थेट नदीत जेसीबी आणि पोकलॅंड लावून रेतीचे उत्खनन केले होते व दिवस—रात्र रेतीची बेकायदेशीर वाहतूक केली होती.  मंजूर रेती ब्रासपेक्षाही कितीतरी अधिक पटीने रेतीचा उपसा केला होता.  याबाबतचे बेकायदेशीर उत्खननाचे व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड वायरल झाले होते. आपल्या अवैद्य व्यवसायाचे बिंग फुटल्यांचे दिसताच, हे व्हिडीओ, चिचाळा येथील सुरज धनराज टिकले व प्रविण संपत बोबाटे यांला, तुम्ही माझी रेती घाटाची उधारी दिली नाही असा खोटा आरोप करीत मारहाण केली. याबाबत सुरज टिकले यांनी मूल पोलिस स्टेशनला तक्रार ​देवून, रेती तस्करीचा व्हिडीओ वायरल केल्यांच्या आरोपावरून संदीप आगडे यांनी  मारहाण केल्याची तक्रार दिली.  या तक्रारीवरून मूल पोलिसांनी संदीप आगडे यांचे विरोधात अप.क्रं. 465/22, कलम 294, 323, 506 भादवी अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!