रोजगाराच्या थापावर मालधक्याचे तकलादू समर्थन
रोजगाराच्या थापावर मालधक्याचे तकलादू समर्थन
मूल शहरातील प्रस्तावित मालधक्का काहीसांठी आता गजकर्णाप्रमाणे झाला आहे. 'सहन होत नाही आणि सांगता येत नाही' अशी काहीची परिस्थिती मालधक्याच्या प्रश्नांने केली आहे. जनमत मालधक्याच्या विरोधात असल्यांने, थेट समर्थन करता येत नाही, आणि या मालधक्याच्या मागे 'माल' असल्यांने, विरोध करून आर्थिक नुकसानही सहन करता येत नाही. अशा विचित्र परिस्थितीत आता, मालधक्का समर्थकांनी, मूल शहरात मालधक्का झाल्यांस, हजारोंना रोजगार मिळणार असल्यांच्या 'थापा' मारणे सुरू केले आहे.
खरचं रोजगार मिळणार?
मूल शहरात मालधक्का झाल्यास, खरच हजारोंना रोजगार मिळणार काय? हा प्रश्न अनेकांकडून वारंवार विचारला जातोय. सुरजागड येथील लाल रंगाचे लोहखनिज, मोठ—मोठ्या हायवाद्वारे, मूल रेल्वे स्टेशनवरील डपींग ग्राऊंडवर आणून टाकले जाणार आहे. येथून जेसीबीने रेल्वेच्या वॅगन मध्ये टाकून देशातील लोहनिर्मीती कारखाण्यात पाठविले जाणार आहे. यात जेसीबी चालकांशिवाय इतर कोणते रोजगार दिसत आहे? या कामात रोजगार कसा मिळणार आहे? हा प्रश्न मालधक्का समर्थकांना वारंवार विचारले असता, या प्रश्नांचे त्यांचेजवळ कोणतेही उत्तर नाही.
खतांचे वाहतूकीकरीता किंवा तांदुळाचे वाहतूकीकरीता या रेल्वे रॅकचा उपयोग झाला असता तर, खत, तांदुळाचे पोत चढाई—उतराईत, स्थानिक मजूरांना काम मिळाले असते, मात्र हे कामच या ठिकाणी होणार नसतांना, लोह खनिज वाहतूकीकरीता रोजगार मिळणार असल्यांच्या थापा कशाला मारल्या जात आहे?
म्हणे, टाटा—जिंदलच्या प्रस्तावित उद्योगासाठी मालधक्का हवा...
मूल येथील भारतीय जनता पार्टीच्या एका जबाबदार पदाधिकारी यांनी आज सोशल मिडीयावर पोस्ट करून, मूल येथे मालधक्का झाल्यास, मूल येथील एम.आय.डी.सी. मध्ये टाटा, जिंदल यांचे हजारो कोटीचे प्रकल्प येणार असून, त्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळणार आहे. मूल एम.आय.डी.सी.मध्ये टाटा—जिंदलचे प्रकल्प येणार असेल तर, लोहखनिज वाहतूकीचा मालधक्का मूल रेल्वे स्टेशनवर कशाला हवे? सुरजागड वरून थेट हायवाने मूल येथील एमआयडीसीत लोह खनिजांची वाहतूक केली जावू शकते. अशा परिस्थितीत राज्याच्या बाहेर लोह खनिजांची वाहतूकीकरीता मूल येथे मालधक्का करण्याची गरज काय? या प्रश्नावर या पदाधिकार्यांनी अजूनपर्यंत कोणतेही उत्तर दिले नाही.
मूल रेल्वे स्टेशनवरील मालधक्यातून लोह खनिजाची वाहतूक केल्यास, सुरजागडवरून शहरातील मध्यवस्तीतून मोठ—मोठे हायवा येणार आहेत. सध्या एटापल्ली, आल्लापल्ली, अहेरी, आष्टी या भागातून अशी वाहतूक सुरू असून, तेथील रस्त्यांची वाट लागलेली आहे. ठिक—ठिकाणी अपघात होत आहेत, नागरीकांनी ट्रके पेटविली आहेत, गावकरी आंदोलन करीत आहे, ही वास्तूस्थिती मालधक्याचे समर्थन करणार्यांना दिसत नसावे काय? यावर एका सत्तारूढ पक्षाचे पदाधिकारी यांनी मूल शहराचे बाहेरून, बायपास बनणार आहे, तेथून ही वाहतूक होवू शकते असा व्यक्त केला. असे असेल तर, मालधक्काचे तातडीने कामे करण्याची गरज काय? आधी पाच वर्षापासून मंजूर झालेल्या बायपासचा विषय मार्गी लावा, नंतरच लोह खनिजाची वाहतूक केले तर, मूलचे भले आहे, मात्र, बायपासला गती का दिली जात नाही?
रेल्वेचा आग्रह मूललाच का?
आजवरच्या चर्चेत रेल्वे प्रशासन मूल येथूनच लोह खनिज वाहतूकीचा आग्रह का धरीत आहे? या प्रश्नाचे उत्तर म्हणजे, मूल शहरात पूर्वीच खतासाठी रॅक मंजूर करण्यात आली आहे. मूल येथे माजी केंद्रिय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर आले असता, त्यांनीच मूल शहरात तिसरी लाईन टाकून खताकरीता व तांदूळाचे वाहतूकीकरीता ते सत्तेत असतांना रॅक मंजूर केल्याचे सांगीतले. याशिवाय, नागपूर येथील पालकमंत्री सुधिरभाऊ मुनगंटीवार यांनी घेतलेल्या मालधक्याचे आढावा बैठकीत, रेल्वेच्या अधिकार्यांनी सांगीतले कि, ज्यावेळी वडसा—चंद्रपूर ब्राडगेज लाईन टाकण्यांत आली, त्याचवेळी ही डबल लाईन करण्यांचे नियोजन करण्यात आले होते व ही लाईन आर्थिकदृष्टया फायद्यात रहावी याकरीता मूल रेल्वे स्टेशनवर रॅक (आताचे भाषेत मालधक्का) नियोजीत करून तशी जागा ठेवण्यात आली. याचा अर्थ रॅक उर्फ मालधक्का हे रेल्वे प्रशासनाच्या रेकार्डवर आधीपासूनच असल्यांने, नव्याने वाहतूकीसाठी मालधक्का करण्याऐवजी मूल येथूनच लोह खनिज वाहतूकीसाठी रेल्वे प्रशासन आग्रही आहे.
पर्यायी जागेचे काय?
नागपूर येथील वनभवनात झालेल्या आढावा बैठकीत, मूल शहरात कोणत्याही परिस्थितीत मालधक्का होणार नाही याची स्पष्टोक्ती पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी दिली होती. नविन पर्यायी कोणती जागा असेल हे पाहणी करण्यांकरीता जिल्हाधिकारी, रेल्वे प्रशासनाचे अधिकारी, वनविभागाचे अधिकारी, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा संध्याताई गुरूनुले, विजय सिध्दावार यांना सुचविले होते. उल्लेखनीय म्हणजे, पर्यायी जागेची पाहणी परस्पर अधिकारी यांनीच करून, मंत्री मुनगंटीवार यांचे निर्देश पायदळी तुडविले.
मालधक्का झालाच तर...!
मूल शहर वासीयांचा मालधक्यास तीव्र विरोध आहे. मालधक्का झालाच तर, दररोज हजारो मोठ—मोठे ट्रकची वाहतूक शहराच्या मध्यभागातून होईल. यातून रस्ते पूर्णत: निकामी होणार असून, या रस्त्यावरून चालणे म्हणजे, अवघड जागेचे दुखणे होणार आहे. भरधाव वेगाने येणारे ट्रक रस्त्याचे कडेला असणार्या दुकानातही शिरण्यांची भिती आहे. आष्टी, गोेडपिपरी येथे असे प्रकार झालेले आहे. अपघाताचे प्रमाण प्रचंड वाढणार आहे. रस्त्याचे कडेला, दुकानात, गावात सर्वत्र लाल लोह खनिज पसरून, नागरीकांचे जीवाला धोका निर्माण होणार आहे, प्रचंड प्रदुषण होणार आहे. मूल शहरातील एकमेव कर्मवीर महाविद्यालयाचे मैदान जवळपास नष्ट होणार असून, बाजूचेच बुध्द टेकडी व शिव टेकडीही या मालधक्याचे प्रभावात येणार आहे. मूल येथील कर्मवीर महाविद्यालयात शिकणार्या हजारो विद्यार्थांनाही या मालधक्याच्या परिणामाला समोरे जावे लागणार असून, ट्रकचे सततचे कर्कश आवाज, लोह खनिजाची धुळ व जीवघेणी वाहतूक यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही प्रभाव पडणार आहे. ज्या भागातून लोह खनिजाची वाहतूक होणार आहे, तो भाग वन्य प्राण्यांच्या भ्रमंतीचा कॅरीडोर असून, वन्यजीवालाही धोका निर्माण होणार आहे.
लोह खनिजाची वाहतूक करण्याकरीता चंद्रपूर शहरातील रेल्वे स्टेशनवर काही वेळ पूर्वी प्रयत्न झाले होते, मात्र तेथील नागरीकांना प्रचंड प्रदुषणांचा त्रास सहन झाल्यांने, नागरीकांनी उठाव केले व नंतर हे काम पडोली—ताडाळीच्या भागात करण्यात आले होते, या ठिकाणी उल्लेखनीय
विजय सिध्दावार
9422910167



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!