कार मध्ये सापडला युवकाचा मृतदेह.

कार मध्ये सापडला युवकाचा मृतदेह.
तळोधी बा (यश कायरकर.)
तळोधी बा.पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चंद्रपूर ब्रम्हपुरी रोडवरील सावरगाव - चिखलगाव जवळील
हनुमान वांडरू मंदिराजवळ   मंगळवारी रात्री 3 वाजता   तळोधी पोलिसांना पेट्रोलिंग सुरू असताना एक कार संदिग्ध उभी दिसली. तपासणी केली असता त्यात लंकेश देविदास कावरे (28) याचा  युवकाचा मृतदेह आढळून आला.  
        लंकेश हा गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील वांढरा गावातील रहिवासी असल्याचे त्याचे मोबाईल फोन वरून लक्षात आले.
            सविस्तर माहितीनुसार, लंकेश ब्रह्मपुरीहून चंद्रपूरच्या दिशेने जात होता.  सावरगाव चिखलगाव दरम्यान वांढरु मंदिराजवळ कार क्र.  एमएच ३४ बीएफ ३५०९ ही गाडी रस्त्याच्या कडेला उभी होती.  तळोधी पोलिसांना रात्री गस्तीवर असताना रस्त्याच्या कडेला उभी असलेली कार दिसली असता त्यांनी तपास केला.  तपासाअंती पोलिसांनी त्याला तात्काळ नागभीड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.  मृतकासोबत सापडलेल्या मोबाईलवरून त्यांनी कुटुंबीयांना माहिती दिली.  त्यांचा मृत्यू मिरगीमुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला असून, शवविच्छेदनानंतर मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल.  कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, लंकेश यांना मिरगी चा त्रास होता असे सांगितले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!