जांभुळघाट येथील सिमेंट काँग्रेटींग रस्त्याचे काम निकृष्ठ दर्जाचे
तीन दिवसातच पडायला लागल्या भेगा
तालूका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
चिमूर : - चिमुर तालुक्यातील मौजा जांभुळघाट येथील वार्ड क्रमांक.१ मध्ये सिमेंट काँक्रीट रस्त्याचे निकृष्ठ दर्जाचे बांधकाम करण्यात आले असून हे संपूर्ण काम इंस्टीमेंट नुसार कोणत्याही प्रकारे करण्यात आले नाही.या मध्ये वापरण्यात आलेले सिमेंट,गिट्टी,रेत्ती व इतर साहीत्य खालच्या दर्जाचे वापरण्यात आल्याने तीन दिवसाच रस्त्यावर भेगा पडायला लागल्या.या वरून असे दिसुन येते की या कामात मोठ्या प्रमानात भष्टाचार झाला आहे.लोक प्रतिनिधीच कंत्राटदाराच्या लायसनवर काम करीत असल्याने बांधकामामध्ये भष्ठाचार मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.याची चर्चा जनतेत होत आहे.वरीष्ठ अधिकाऱ्यांनी व अभियंता यांनी तात्काल योग्य चौकसी करून कंत्राटदार यांचेवर कार्यवाही करण्यात यावी.अशी मागणी जांभुळघाट येथील स्थानिक नागरिकांकडून होत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!