गणपती विसर्जन करून काजळसर येथे जात असतांना ट्रॅक्टर पलटी मारल्याने जागेवर १ महिला ठार तर ५० जण जखमी
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - चिमूर जवळील नेरी पासून १५ किमी अंतरावरील काजळसर येथे गणपती विसर्जन करून ट्रॅक्टरने जात असतांना ट्रॅक्टर भर वेगात पलटल्याने १ महिला जागेवर ठार तर २५ ते ३० विद्यार्थी गंभीर जखमी त्यात १५ ते २० महिला सुद्धा गंभीर जखमी झाल्या आहेत. यांच्यावर उप जिल्हा रुग्णालय चिमुर येथे प्रथमोपचार सुरु असून काहींना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले आहे.चिमूर येथील पोलीस पुढील तपास करीत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!