एफ.ई.एस. गर्ल्स महाविद्यालयात एन.एस.एस स्थापना दिवस साजरा
प्रतिनिधी :- कुमुदिनी भोयर
फिमेल एज्युकेशन सोसायटी चंद्रपुर द्वार संचालित एफ ई एस गर्ल्स कॉलेज चंद्रपुर येथे रासेयो विभाग द्वारा एन. एस. एस स्थापना दिवसाचे आयोजन करण्यात आले
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विद्या जुमडे, प्रमुख अतिथि प्रा.डाॅ.आय.एस.कोन्डा इंगजी विभाग प्रमुख जनता महाविद्यालय चंद्रपुर,प्रा डाॅ.राजेश चिमनकर, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ राजेंद्र बारसागडे यांची प्रामुख्याने विचारमंचावर उपस्थिती होती
डॉ विद्या जुमडे यानी रासेयो भूमिका, उद्देश , स्वयंसेवकाच्या काय॔यावर प्रकाश टाकला तर प्रा.डाॅ.आय.एस.कोंन्डा् यानी रासेयो कार्यक्रमातून विद्यार्थिनीन मध्ये असलेल्या सुप्त गुणाना चालना मिळते रासेयो एक विचार मंच आहे, सामुदायिक विकासातुन खरे शिक्षण मिळते अशाप्रकारचे विचार व्यक्त केले तर प्रा डॉ राजेश चिमनकर यानी रासेयो बिला यातील रंगाची भुमिका विषद करुण रासेयो उपक्रमात विद्यार्थिनी मोठया संख्येने भाग घ्यावा अशा प्रकारचे विचार व्यक्त केले.
रासेयो स्वयंसेवीका कुमारी सूफिया शेख रासेयो कार्यक्रमाला अनुसरुन विचार व्यक्त केले
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आले
कार्यक्रमाचे आयोजन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डाॅ राजेंद्र बारसागडे, सहकाय॔कम अधिकारी प्रा डॉ कल्पना कावऴे यानी केले
कार्यक्रमाचे सुत्र संचालन डॉ कल्पना कावऴे यानी तर आभार प्रा.डॉ राजेंद्र बारसागडे यानी केले
सदर कार्यक्रमा करीता प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थिनी मोठया संख्येने उपस्थित होत्या.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!