मालधक्का विरोधात मूल शहरातील नागरिक रस्त्यावर.

मालधक्का विरोधात मूल शहरातील नागरिक रस्त्यावर.


सुरजागड येथील लोह प्रकल्पातील लोह खनिज मूल येथे आणून, इथून देशात इतरत्र पाठविण्यासाठी निर्मानाधीन मालधक्क्याला आज मूल शहरात तीव्र विरोध करण्यात आला.
मुल शहर बचाव संघर्ष समितीच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.  हजारोच्या संख्येत मोर्चा काढून हा विरोध करण्यात आला.
आजच्या मोर्चात शहरातील सर्वपक्षीय नेते, कर्मवीर महाविद्यालयातील विद्यार्थी, नवभारत कन्या विद्यालय, नवभारत विद्यालय येथील हजारो विद्यार्थी, गावातील व्यापारी मंडळी, पत्रकार, विविध सामाजिक संघटनाचे पदाधिकारी, यांची लक्षणीय उपस्थिती होती‌
मुल येथील कर्मवीर महाविद्यालयाचे प्रांगणातून हा मोर्चा  निघाला.  गांधी चौक येथे गांधीजींच्या पुतळ्याला माल्यार्पण करून मोठ्या संख्येने नागरिक उपविभागीय कार्यालय मुल येथे धडकले. येथे उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी मोर्चासमोर येऊन निवेदन स्वीकारले.
आजचा मोर्चा जवळपास दोन किलोमीटर लांबीचा होता एवढा मोठा  मोर्चा पहिल्यांदाच निघाल्याचे बोलल्या जात आहे.
मालधक्क्याचे विरोधात  शहरवासीयांच्या भावना तीव्र असून मालधक्का करण्याचा प्रयत्न केल्यास आंदोलन आणखी तीव्र केला जाईल असा इशारा आयोजकांनी दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!