जांभुळघाट येथील सिमेंट काँक्रेटिंग रस्त्यावरच्या फलकाला मारला काळा पेंट
खोटी माहीती असलेल्या फलक कंत्राटदाराने लावला तरी कसा ?
तालूका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
चिमुर : - मौजा जांभुळघाट येथील वार्ड नं.१ मध्ये झालेल्या सिमेंट काँक्रेटिकरण रस्त्याच्या कडेला लावलेल्या अगोदरच्या फलकाला पेंट मारण्यात आला.चौकसी केल्या नंतर अशी माहिती मिळाली कि ज्या निधी चा फलक लावण्यात आला होता त्या निधीतील रस्त्याचे बांधकाम नसल्या चे सिध्द झाले.त्या नंतर लगेच कंत्राटदारा यांचेकडून फलकाला काळा पेंट मारण्यात आला.या वरून फलकावर खोट्या माहितीचे फलक लावण्यात आले.खोटी माहिती व त्याचे फलक कंत्राटदाराने लावला तरी कसा ? अश्या प्रकारचे कामे कुठे झाले तर नाही ना ? रस्त्याचे बांधकाम तर निकृष्ठ दर्जा चे होते पण फलकावर सुद्धा खोटी माहीती देण्यात आली होती.कंत्राटदार बरोबर ग्राम सेवक सुद्धा दोषी असल्याने फौजदारी कार्यवाही वरीष्ठ अधिकाऱ्या कडून करण्यात यावी अशी मागणी जांभुळघाट वासीय नागरीकांकडून होत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!