शिक्षकांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या आमदार बंब यांना समज द्यावी
शिक्षकांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या आमदार बंब यांना समज द्यावी
पुरोगामी शिक्षक संघटनेकडून निषेधाचे निवेदन
सध्या राज्यातील शिक्षणाची बिकट अवस्था असून शिक्षक मानसिक ताणतणावात जगत आहे. विद्यार्थी, शिक्षक व पालक यांना शासनाकडून ठोस उपाययोजना हव्या आहेत. तेव्हाच दर्जेदार शिक्षणव्यवस्था उभी राहील. शासनाने राज्यातील शिक्षणतज्ञ, पालक, विद्यार्थी आणि शिक्षक संघटना यांची मते जाणून घेऊन तात्काळ उपाय योजावेत.
-किशोर आनंदवार, जिल्हा अध्यक्ष
----------------------------------------
जनप्रतिनिधी यांनी सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे संवेदनशील व सहानुभूतीने पाहणे गरजेचे आहे. आजच्या आकडेवारीनुसार जवळपास सर्वच लोकप्रतिनिधी व अधिकारी याच शाळांतून घडलेले आहेत. पुढे आलेल्या प्रतिनिधी आणि अधिकारी यांनी या सरकारी शाळा टिकल्या पाहिजे, दर्जेदार झाल्या पाहिजेत यासाठी सर्वतोपरी मदत करतील अशी अपेक्षा आहे.
मात्र आमदार प्रशांत बंबसारखे लोकप्रतिनिधी तोकड्या माहितीच्या आधारे विधानभवन व प्रसारमाध्यमामध्ये सरसकट सर्वच शिक्षकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत आहेत. ग्रामीण भागातील परिस्थिती आणि बदलते युग यानुसार माननीय आमदारांचे मत किती हास्यास्पद असून, शिक्षक मला जीवे मारतील हा त्यांचा आरोप शिक्षण व्यवस्थेचे अवमूल्यन करण्यासारखे आहे. शिक्षक आमदारांचा खून करतील, म्हणून शिक्षकीपेशाला गालबोट लावणाऱ्या आमदार प्रशांत बंब यांना समज देण्यात यावी. अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांना पाठविले आहे .
शिक्षकांची बदनामी करणारे आमदार प्रशांत बंब यांच्या निषेधाचे निवेदन देण्याकरिता ५ सप्टेंबर शिक्षकदिनी पुरोगामी समितीचे राज्यनेते विजय भोगेकर, राज्य सरचिटणीस हरीश ससनकर, राज्याध्यक्ष महिला मंच अल्का ठाकरे, राज्यसचिव निखिल तांबोळी, जिल्हा प्रमुख सल्लागार दिपक वर्हेकर, जिल्हा नेता नारायण कांबळे, जिल्हाध्यक्ष किशोर आनंदवार, जिल्हा सरचिटणीस संजय चिडे, जिल्हा कार्याध्यक्ष गंगाधर बोढे, जिल्हा कोषाध्यक्ष सुनिल कोहपरे, कार्यालयीन सचिव सुरेश गिलोरकर जिल्हा उपाध्यक्ष मोरेश्वर बोंडे, रवि सोयाम,सुधाकर कन्नाके,लोमेश येलमुले, जिल्हा नेता महिला मंच सुनिता इटनकर, महिला मंच अध्यक्ष विद्या खटी, सरचिटणीस पौर्णिमा मेहरकुरे,कार्याध्यक्ष सिंधु गोवर्धन, कोषाध्यक्ष लता मडावी, उपाध्यक्ष पुनम सोरते, सुलक्षणा क्षिरसागर, सहसचिव दुष्यंत मत्ते,प्रमुख संघटक नरेश बोरीकर, प्रमुख संघटक ज्ञानदेवी वानखेडे व जिल्हाभरातील शेकडो पुरोगामी शिलेदार उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!