किटाळी (बोरमाळा) येथील इसमाचा वीज पडून मृत्यू.
तळोधी बा.
नागभीड तालुक्यातील किटाळी(बोर) येथील इसमाचा आज सायंकाळी 4:25 वाजता वीज पडून मृत्यू झाला.
मृतक रमेश हरी मेश्राम (50) राहणार किटाळी (बोर) हा इसम आपल्या शेळ्या घेऊन गावाशेजारी स्मशानभूमीमध्ये चारत असताना सायंकाळला अचानक आलेल्या पावसामुळे स्मशानभूमीतील खुर्चीवर झाडाखाली बसून असताना, अचानक त्यांच्या जवळील झाडावर वीज पडून त्या विजेच्या धक्क्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
विशेष म्हणजे या परिसरात वीज पडल्याची ही या आठवड्यातील दुसरी घटना आहे. याआधी दोन दिवसांपूर्वी जवळच्या घोडाझरी गावालगत वीज पडल्याने तीन गाई व एक शेळी मेल्याची घटना घडलेली होती. मोक्का पंचनामा करून शव विच्छेदनाकरिता तालुका रुग्णालय नागभीड येथे करता हलविण्यात आले आहे.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!