आता कचरा संकलन होणार क्यू आर कोडने
घंटागाडीने कचरा नेण्यांस कामचुकार करणार्यास आता चाप बसणार असून, यापुढे ज्या घरातून कचरा संकलन केले जाणार आहे, त्या घराचे क्यू आर कोड स्कॅन करावे लागणार आहे. ही डिजीटल सुविधा मूल नगर परिषदेकडून करण्यात येणार असून, तशी प्रक्रीया नगर परिषदेने सुरू केली आहे.
स्वच्छता स्पर्धेत अनेक पारितोषिक मिळविलेले नगर परिषद मूलचे सफाई कर्मचारी बर्याचदा घरातून प्रत्यक्ष कचरा संकलन न करता, परस्पर निघून जातात. घरातून कचरा संकलनाचे नगर परिषद प्रत्येक कुटूंबाकडून वर्षाल 180 रूपये घेत असतांना, प्रत्यक्ष कचरा मात्र उचलल्या जात नसल्यांने, नागरीकांची सफाई कर्मचार्यांचे विरोधात तक्रारी होत्या. त्यावर मूल नगर परिषदेने क्यू आर कोडचा उपाय योजल्यांने नागरीकांचे रोष कमी होण्यांची शक्यता आहे.
नगर परिषदेचे कर्मचारी घरासमोर क्यू आर कोडच्या धातूच्या पट्या लावत असून, ओला कचरा आणि सुका कचरा करीता दोन स्वतंत्र क्यू आर कोडचे स्टिकर सुध्दा प्रत्येक कुटूंबियांना देत आहे.
मूल नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय पाटनकर यांचे मार्गदर्शनात क्यू आर कोडने कचरा संकलनावर नियंत्रण ठेवण्याकरीता आरोग्य व स्वच्छता निरीक्षक अभय चेपूरवार प्रयत्नशल आहेत. नागरीकांनी या कार्यात सहकार्य करण्याचे आवाहन अभय चेपूरवार यांनी केले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!