बोगस कागदपत्राच्या आधारे सरपंचाने लाटला श्रावणबाळ योजनेचा लाभ

बोगस कागदपत्राच्या आधारे सरपंचाने लाटला श्रावणबाळ योजनेचा लाभ
तक्रारीनंतर तहसीलदार यांनी वसूल केली अनुदानाची रक्कम

  सावली  
शासनाकडून वयाच्या ६५ वर्ष  पुर्ण करणा-या वृद्धांसाठी  दरमहा  एक हजार रुपये अनुदान देण्यात येणा-या श्रावणबाळ योजनेत  वय कमी असतांना खोटे वयाचे कागदपत्र सादर करून बोगस लाभार्थी बनुन अनुदान लाटना-या मंगरमेंढा येथील सरपंच गुरुनाथ मिसार यांचेकडून तहसीलदार सावली यांनी रक्कम वसूल केली आहे. 
          ‌ वृध्दापकाळात जेष्ठ नागरीकांच्या काठीचा आधार व  विभक्त कुटुंबाच्या जिवन शैलीतुन वृध्दांना सन्मानाचे जिवन जगता यावे यासाठी शासनाने ६५ वर्षांवरील वृध्द नागरिकांसाठी दरमहा  एक हजार रुपये अनुदान देणारी राष्ट्रीय श्रावण बाळ योजना सुरु केली, परंतु  त्याचा बोगस  लाभार्थी बनुन गैरफायदा घेणारांची संख्या वाढल्याने शासनाची अर्थीक फसवणुक होत  असल्याच्या तक्रारी प्रशासनाला येवु लागल्या आहेत.
       असाच प्रकार मंगरमेंढा येथील विद्यमान सरपंच पदावर असलेल्या ५८ वर्ष वयाच्या गुरुदास निसार यांनी पदाचा गैरवापर करत ६५ वर्ष  वयाचा खोटा बोगस पुरावा सादर करुन सावली तहसील कार्यालयातुन श्रावण बाळ योजना मंजूर करुन घेतली. याबाबतची लेखी तक्रार गावातीलच एका नागरिकाने पुराव्यासह सावलीचे तहसिलदार यांचे कडे केली. तक्रारींचे अनुषंगाने  चौकशी करण्यात आली,चौकशी अंती लाभार्थी कडुन बोगस वयाचा पुरावा सादर करुन फरवरी २०२० ते डीसेंबर २०२१ या कालावधीत एकुन तेवीस हजार रुपयांची उचल केल्याचे लक्षात आले. सदर  उचल केलेली रक्कम  वसुल करण्याचे आदेश सावलीचे तहसीलदार यांच्याकडुन काढण्यात आले. त्यानुसार उचल केलेली संपुर्ण रक्कम सरपंच गुरुदास निसार यांचेकडुन नगदी वसुल करण्यात येवुन धनादेश क्र  १८४१८ नुसार शासनाच्या तीजोरीत जमा करण्यात आले आहे.
          या प्रकरणामुळे तालुक्यातील ख-या लाभार्थी ऐवजी असे खोटे पुरावे सादर करुन बोगस  लाभ घेणा-यांमध्ये धडकी भरली आहे..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!