२४ व्या 'युवा संसद कार्यक्रमात' जवाहर नवोदय विद्यालय तळोधी बा.ची राष्ट्रीय स्तरावर निवड.
तळोधी बा.(यश कायरकर)
जवाहर नवोदय विद्यालय चंद्रपूर येथे दिनांक २७ ऑगस्ट २०१२ रोजी २४ व्या युवा ससद' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी संसदेत चालणान्या कामकाजाचे प्रातिनिधीक स्वरूप सर्वासमोर सादर केले. आपल्या प्रभावी संवाद कौशल्याने विद्याथ्र्यांनी सर्वांची मने जिंकली. २७ ऑगस्ट रोजी विद्यालयात संपन्न झालेल्या २४ व्या युवा संसद 'कार्यक्रमाची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली व आता विद्यार्थ्यांना जयपूर येथे जाऊन राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या युवा संसद स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी चिमूर विधानसभा मतदार संघाचे आमदार भांगडियाजी यांचे प्रतिनिधी गणेशजी तर्वेकर अध्यक्ष समिधा शिक्षण संस्था नागभीड हे होते, अरविंद चिलबुले नागभीड पंचायत समिती गटशिक्षण अधिकारी व महात्मा फुले विद्यालय तळोधीचे प्राचार्य श्री. घनश्याम बुलबुले हे या कार्यक्रमास उपस्थित होते.
युवा संसद हा कार्यक्रम दर दहा वर्षानी आयोजित केला जातो. याकरिता काही विद्यालयांची नवोदय विद्यालय समिती द्वारा निवड केली जाते. यावर्षी हा बहुमान जवाहर नवोदय विद्यालय चंद्रपूरला (तळोधी बा.) मिळाला.
कार्यक्रमाचे परीक्षक गणेशजी तर्वेकर, अरविंद चिलबुले व घनश्याम बुलबुले है होते.
तर त्यांना पुढील वाटचालीसाठी संपूर्ण जवाहर नवोदय विद्यालय चंद्रपूर तर्फे शुभेच्छा दिल्या.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!