दुषित पाण्यामुळे नवेगाव पुनर्वसन ग्रामवासियांचे आरोग्य धोक्यात
सावरी : प्रतिनिधी ( विनोद उमरे )
सावरी : - चिमूर तालुक्यातील नवेगाव पुनर्वसन येथिल मागिल काही महीन्यापासुन विहीर व नळा द्रावारे पाणीपुरवठा केला जात आहे.परंतु अलिकडे नवेगाव पुनर्वसन वासियांना विहीर आणि नळाच्या माध्यमातून गढुळ वं गाळ मिक्षित पाण्याचा पुरवठा होत असल्याने नवेगाव पुनर्वसन ग्रामवासियाचे आरोग्य धोक्यात आले आहे.दररोज गदूळ व गाळ मिक्षित पाण्याचा पुरवठा होत असल्याने साथीचे आजार पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकीकडे सततधार पावसाने जनता हैराण झाली असताना दुसरीकडे दुषित पाणी पुरवठ्यामुळे नवेगाव पुनर्वसन येथिल नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे दुषित पाण्यामुळे मलेरिया, हिवताप,अतिसार सारख्या साथीचे रोग पसरण्याची शक्यता नाकारता येत नसुन नवेगाव ग्रामवासियांना शुध्द पाणी पुरवठा करावा अशी मागणी नंदकिशोर चौखेरी,सुधाकर गायकवाड,चंदु नन्नावारे,प्रकाश चौधरी,हरिदास धारणे , अविनाश नेहरे,रुपेश नेहाने, अमोल सोनवणे, यांनी शासनाकडे मागणी केली आहे.लवकरात लवकर नवेगाव पुनर्वसन ग्रामवाशीयांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात यावा याकरिता उपायोजना करण्यात यावे अशी मागणी केली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!