चिमूर शहरात अवैध दारू विक्री जोमात
पोलीस व उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - चिमूर शहरामध्ये भर वस्तीमध्ये विविध ठिकाणी मोहफुलाची तसेच देशी दारूची खुलेआम सर्रासपणे दुकान लावून दारू विक्री सुरू आहे. या व्यवसायात महिला व पुरुषांचाही समावेश आहे. या व्यवसायामुळे अनेकांची घरे उध्वस्त झाली.संसार उघड्यावर पडले असून पोलीस तसेच नगर परिषद यंत्रणा यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यास असमर्थ ठरत आहे.हे सर्व व्यवसाय अतिक्रमणित जागेवर असूनही कारवाई नाही ? गोरगरीब जनता जेव्हा एखादी व्यवसाय वैध रित्या जनतेला धोका होणार नाही याची काळजी घेत अतिक्रमणित जागेवर व्यवसाय करीत असेल तर त्यांची दुकाने नगर परिषद काहीतरी कारण दाखवीत डोजर चालवून तोडताड करून नगर परिषद येथे संपूर्ण साहित्य जप्त करीत असतात.आणि खरोखरच अवैध बांधकाम तसेच अवैध दारू विक्री व्यवसायावर कारवाई नाही म्हणजे काय? उप विभागीय पोलीस अधिकारी , पोलीस अधिक्षक , जिल्हाधिकारी यांनी लक्ष देऊन विशेष पथक पाठवून कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्थानिक जनतेकडून केली जात आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!