रेल्वे मालधक्का विरुद्ध मुल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा तर्फे भव्य जनआंदोलन



मूल प्रतिनिधी

 दिनांक २८-०९-२०२२ रोज बुधवारला  सकाळी ११.००  वाजता  मूल येथे होत असलेल्या रेल्वे माल धक्का विरुद्ध तथा  केंद्र सरकारविरुद्ध गांधी चौक मूल येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष मेहबूबभाई शेख ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत व राष्ट्रवादी काँग्रेस चे  नेते  बल्लारपूर विधानसभा क्षेत्र  अध्यक्ष सुमीत समर्थ ह्यांचे नेतृत्वात  ठीय्या आंदोलन  गांधी चौक मूल येथे आयोजन करण्यात आले.


        सदर आंदोलनात  प्रदेशाध्यक्ष  मेहबूब भाई ह्यांनी केंद्र सरकारच्या आशीर्वादाने मूल येथे होत असलेला रेल्वे मालधक्का बाबत केंद्र सरकारवर कडाडून टीका केली.
         माल धक्का विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे तथा देशाचे नेते  आदरणीय शरदचंद्रजी पवार व खासदार सुप्रिया ताई सुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ह्यांच्यापर्यंत नक्की पोहचवून मूल शहराला न्याय मिळवून देण्याकरिता सदैव प्रयत्न करीन असा ह्यांनी आश्वासन दिले.


       राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फक्त न्याय मिळवून देऊ शकते असा विश्वास सुमीत समर्थ ह्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दर्शविला.
     ह्यासोबत राष्ट्रवादी युवक  काँग्रेस चे प्रदेश कार्याध्यक्ष नितीन भटारकर ह्यांनी सुद्धा मार्गदर्शन केले तसेच सर्व  उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रेल्वे मालधक्याच्या विरोधात निदर्शने देऊन गांधी चौक ते तहसील कार्यालय पर्यंत पदयात्रा काढून ढोल - ताशा चा गजऱ्यात रॅली व निदर्शने देऊन तहसील कार्यालय येथे निवेदन देण्यात आले.
             व ह्यांनंतर चा आंदोलन तीव्र स्वरूपाचा घेण्याचा ईशारा सुद्धा देण्यात आला.




            सदर आंदोलन यशस्वी  होण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुकाध्यक्ष किसन वासाडे , शहर अध्यक्ष भास्कर खोब्रागडे , तालुका महिला अध्यक्ष नीता गेडाम , शहर महिला अध्यक्ष सौ अर्चना चावरे, युवक तालुकाध्यक्ष समीर अल्लूरवार , शहर कार्याध्यक्ष महेश जेंगठे, युवा नेते बंडू साकलवार , अनिकेत मारकवार , शहर उपाध्यक्ष दुष्यांत महाडोळे तालुका सचिव ज्ञानेश्वर वाघमारे ,करन शेंडे, अजय त्रिपत्तीवार , नंदू बारस्कर प्रभाकर धोटे , हेमंत सुपणार , रंगनाथ पेडुकर , लाला साळवे , संदेश भोयर ,अशोक मारगणवार , मंगल मशाखेत्री , इंद्रापाल पुणेकर रोहिदास वाढई, शुभम शेंडे, सतीश गुरनुले , संदीप तेलंग ,बालाजी लेनगुरे ,राहुल तोटावार , संध्या निकुरे , जयश्री झरकर ,  मारोती रोहिने , गणेश गायकवाड  आदी बहुसंख्य पदाधिकारी हजारो च्या संख्येने जणआंदोलन स्वइच्छेने रॅलीत सहभागी होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!