महसुल विभागाच्या आर्शिवादाने जांभुळघाट येथे अवैध मुरूमाचे दैनंदिन उत्खनन सुरू
तालुका प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
चिमुर : - चिमूर तालुक्यातील मौजा जांभुळघाट येथे मागील तीन ते चार दिवसापासुन अवैध रित्या मुरमाचे उत्खनन पोकलँड मशीन द्वारे हायवा वाहनांच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात सुरू असुन महसुल विभागाचे पुर्ण पणे याकडे दुर्लक्ष होतांना दिसून येत आहे. ,व त्यांच्याच आर्शिवादाने हे नेहमी तर सुरू नाही ना ? अशी जनतेत चर्चा सुरू आहे. या विषयी महसुल विभागाला वारंवार सुचना देऊन शुध्दा लक्ष न देणे म्हणजे मोठी शंका निर्माण करणारी बाब आहे.महसुल विभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यानी या अवैध मुरूमाची चौकशी करून तात्काल कार्यवाही करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावे.अशीही जनतेकडून मागणी केली जात आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!