विम्याची रक्कम शेतकऱ्यांना त्वरित द्या अन्यथा पिक विमा कार्यालय तोड फोड करु - प्रहार सेवक विनोद उमरे यांचा इशारा
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - चिमूर तालुक्यातील मागील सन २०२० - २१ व सन२०२१ - २२ या दोन्ही वर्षात रोगराहीमुळेव अवकाळी पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे पिकांचे अतोनात नुकसान झाले.पिकाचे नुकसान टाळण्यासाठी पिक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना पिक विमा योजनेचे लाभ घ्यावे अशी मागणी सामाज कार्यात नेहेमी अग्रेसर असणारे शेतकरी नेते प्रहार सेवक विनोद उमरे यांनी केले आहे.या वर्षाला अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पीक विमा धारक शेतकऱ्यांना पंचनामे होऊनसुद्धा त्यांना अजूनही पीक विमा प्राप्त झालेला नाही.चिमूर तालुक्यात मागिल वर्षी सोयाबीन पिकाला कंपा रोग व कापूस पिकाला गुलाबी बोंड अळी लागली होती या वर्षी अतिदुष्टीमुळे सर्व पिक मातीमोल झाले आहे.पिक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना त्वरित पिक विमा योजनेचे लाभ देण्यात यावे अन्यथा प्रहार जनशक्ती पक्ष चिमूर च्या वतिने पिक विमा कार्यालयाची तोडफोड फोड करण्यात येईल. प्रहार सेवक विनोद उमरे व त्याचे सहयोगी प्रहार सेवक मिलिंद खोब्रागडे, मुरलीधर रामटेके, सत्यपाल गजभे, सचिन घानोडे, नारायण निखाडे यांचा पिक विमा कंपनीला इशारा.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!