विज पडल्याने तीन गाई व १ बकरी ठार

विज पडल्याने तीन गाई व १ बकरी ठार

तळोदी (बा) (यश कायरकर)
         नागभीड तालुक्यातील घोडाझरी तलाव लगत असलेल्या घोडाझरी या गावातील शेतकन्यांच्या गाई व एक बकरी विज पडून ठार झाल्याची घटना काल घडली. 
          काल दुमारच्या सुमारास आलेल्या  विजेच्या कडकडासहीत घोडाझरी परिसरात मुसळधार पाऊस पडला. यावेळी गावातील गुराखी गाई चरायला घेऊन गेलेला होता. परन्तु पाऊस पडत असताना गुराखी गुरे गावाकडे घेऊन येतात पडलेल्या विजेच्या तडाख्याने तिन गाई व एक शेळी जागीच ठार झाल्या.
          यावेळी सुरेश दडमल यांची एक गाय , चरणदास रंघये यांच्या दोन गाई,  व रामकृष्ण श्रीरामे यांची एक बकरी ठार झाली. तलाठ्याने मोक्का पंचनामा केला असुन. विज पडल्यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले असून,  शासनाने नुकसानग्रस्त शेतकल्यास नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!