अतिक्रमनीत जागेवर घरकुलाची परवानगी द्या - प्रहार सेवक विनोद उमरे याची मागणी
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - चिमूर तालुक्यातील सावरी (बिड) येथे गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यात असलेल्या व नियमित घरटॅक्स देत असलेल्या सावरी (बिड) येथिल घरकुल लाभार्थ्यांना घरकुल बांधण्याची परवानगीची मागणी समाज कार्यात नेहेमी अग्रेसर असणारे शेतकरी नेते प्रहार सेवक विनोद उमरे यांनी केली आहे.सावरी बिडकर येथिल बहुतांश घरे ही शासनाच्या अतिक्रमनीत जागेवर असून वास्ताव्यास असलेल्या नागरिकांना ही जागा गावठाणा म्हणून दिली व पात्र लाभार्थ्यांला या जागेवर घरकुलाचा लाभ देण्यात यावे अशी मागणी गट विकास अधिकारी चिमूर यांना निवेदनातून प्रहार सेवक विनोद उमरे व त्यांचे सहयोगी मुरलीधर रामटेके, मिलिंद खोब्रागडे, ऋतिक जांभुळे,आदीत्य नन्नावरे यांनी केली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!