जीवनामध्ये आर्थिक गुंतवणूक अधिक महत्त्वाची निरंजन कायंदेचे प्रतिपादन : वाणिज्य व प्रबंधन विभागाचा उपक्रम
जीवनामध्ये आर्थिक गुंतवणूक अधिक महत्त्वाची
निरंजन कायंदेचे प्रतिपादन : वाणिज्य व प्रबंधन विभागाचा उपक्रम
ब्रह्मपुरी /ता प्र
" जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीला चढउतार बघावे लागतात.यात आर्थिक बाजू अतिशय महत्त्वाची असून ज्याचा आर्थिक कणा उत्तम तो सुखदायी जीवन जगतो. प्रत्येक व्यक्तीने आपल्या मासिक उपन्नाचे तीस टक्केतरी गुंतवणूक करावी.विशेषतः शेअर मार्केट, म्युच्युअल फंडमध्ये पैसा गुंतवावा, त्यामुळे आपले पुढचे आयुष्य सुखकर होईल.यासाठी जीवनामध्ये आर्थिक गुंतवणूक अधिक महत्त्वाची आहे. " असे विवेचन नागपूरचे निरंजन कायंदेनी केले.
ते नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयातील वाणिज्य व प्रबंधन विभाग आयोजित कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ डी एच गहाणे तर उपस्थितीत ओंकार इंदुरकर, विभागप्रमुख डॉ रेखा मेश्राम,डाॅ सुभाष शेकोकर,डाॅ राजेंद्र डांगे, डॉ किशोर नाकतोडे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक, परिचय व संचालन विभागप्रमुख डॉ रेखा मेश्राम तर आभार डॉ अजित खाजगीवालेंनी मानले.यशस्वीतेसाठी डॉ तात्याजी गेडाम, डॉ भास्कर लेनगुरे, प्रा आकाश मेश्राम, प्रा विवेक नागभिडकर, प्रा जयेश हजारेंनी मोलाचे सहकार्य केले



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!