भरगच्च गर्दीतून ॲम्बुलन्स साठी केला मार्ग मोकळा,पोलीस आणि गणेश भक्तांनी दिले माणुसकीचे दर्शन

भरगच्च गर्दीतून ॲम्बुलन्स साठी केला मार्ग मोकळा,पोलीस आणि गणेश भक्तांनी दिले माणुसकीचे दर्शन

मूल (अमित राऊत )

मूल शहरात गणपती बाप्पाला काल निरोप देण्यात आला. मूल येथील गणपतीचे विसर्जन हे भव्य विसर्जन दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.  विसर्जनावेळी मूल च्या मुख्य गांधी चौकात भरगच्च गर्दी होत असते. गुलालाची उधळण आणि त्यावर बेभान होऊन भक्त नाचत गाजत असतांनाच अचानक रुग्णाला घेऊन जाणारी ॲम्बुलन्स येते तेव्हा गणेश भक्त आणि बंदोबस्तात असलेले पोलीस धावपळ करीत ॲम्बुलन्स ला मार्ग मोकळा करून देतात.

विशेष म्हणजे मुख्य मार्गावर भरगच्च भक्तांची गर्दी आणि गाड्यांची रांग लागली असताना सतत तीन ॲम्बुलन्सला जाण्यासाठी मार्ग मोकळा करून देत माणुसकीचे दर्शन घडवून आणल्याने पोलिसांचे आणि गणेश भक्तांचे कौतुक करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!