वडेगाव मेंढा येथे व्यसनमुक्तीपर प्रदर्शनी तथा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न
गडचिरोली ( प्रतिनिधी)-
वडेगाव मेंढा ग्रामगीता प्रणित ग्रामनवनिर्माण समितीच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते तथा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच रोगनिदान औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन डॉ. चंद्रकांत लेनगुरे (गडचिरोली) यांच्या हस्ते झाले तर अध्यक्षस्थानी ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते. प्रमुख अतिथी म्हणून वैद्यकिय अधिकारी डॉ. भूवन मेश्राम, ज्येष्ठ श्रीगुरुदेव प्रचारक प्रल्हाद खुणे (आंधळी) , नशाबंदी मंडळाचे जिल्हा संघटक संदीप कटकुरवार, पोलिस पाटील जगदीश वनवे (डोंगरतमाशी), नामदेव लाकुडवाहे , डोमाजी गेडाम, प्रभाकर भागडकर , दीपक बद्दलवार , निहार रायपुरकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक ज्येष्ठ प्रचारक उदाजी बावणे महाराज यांनी केले. डॉ.लेनगूरे यांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. ग्रामगीता ग्रंथ आणि ग्रामविकासासाठी लोकसहभाग यासंदर्भात ग्रामगीताचार्य बोढेकर यांनी मार्गदर्शन केले.
ग्रामनवनिर्माण अभियान समितीतर्फे वडेगाव येथील इयत्ता दहावीच्या परीक्षेत प्राविण्य प्राप्त केलेल्या आशिष दुगे, कु. मयुरी कुमरे, मयुर हलामी यांचा सन्मानपत्र व ग्रामगीता भेट देऊन सत्कार करण्यात आला. तर सातत्याने कार्य करणाऱ्या उदाराम बावणे महाराजांना कार्यगौरव पुरस्कार देण्यात आला. तसेच उत्साहाने ग्रामनवनिर्माण कार्यात सहभाग देणारे शामराव हजारे,वामन जोशी, नामदेव कोवे, सुधाकर जोशी, लक्ष्मीबाई कुमरे आदींना ग्रामगीता देऊन सन्मानित करण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी नंदकिशोर मसराम यांनी केले. युवा वर्ग व्यसनांच्या आहारी जाऊ नये. स्वतःवर संयम ठेवावा,दारू - तंबाखू या सारख्या घातक व्यसनांपासून दूर राहावे असे जनजागृती करणारे पोस्टर प्रदर्शन वडेगावच्या मुख्य चौकात नशाबंदी मंडळाचे वतीने लावण्यात आले होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!