गोंडवन विकास संस्था कर्मचाऱ्यांचा एकत्रिकरण सोहळा संपन्न
तळोधी बा.;
गोंडवन विकास संस्था नागभीड संचालक मंडळ व संस्थेद्वारा संचालित कर्मवीर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय नागभीड, वासाळा आणि अमिर्झा येथील कर्मचाऱ्यांचा स्नेहमिलन सोहळा दि.१८/०९/२०२२ रोज रविवारला महाविद्यालयाच्या स्व.वसंतराव कसबेकर सभागृहात संपन्न झाला.
संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष आदरणीय राजाभाऊ देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यात मुख्य मार्गदर्शक म्हणून संस्था कार्याध्यक्ष सन्मा.प्रा.डॉ. राजनजी जयस्वाल सर प्रमुख अतिथी म्हणून संस्था सचिव सन्मा.रवींद्र जनवार उपस्थित होते.
याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक प्रा.डॉ.श्री.राजन जयस्वाल सर यांनी संस्थेने स्थापनेपासून ५० वर्षांची यशस्वी वाटचाल केल्याबद्दल संस्थेचा *सुवर्ण महोत्सव* आणि जाने.२०२३ मध्ये संस्थापक सचिव स्व.जनवार गुरूजी यांच्या जयंतीला १०० वर्ष पूर्ण होत असल्याने २०२३-२०२४ हे वर्ष *जन्म शताब्दी वर्ष* विविध कार्यक्रमाचे आयोजन करून कसे साजरे करता येईल याविषयी विस्तृत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मा.राजाभाऊ देशपांडे यांनी आपणास स्व.जनवार गुरुजी यांनी पाहिलेले स्वप्न आपल्या शैक्षणिक कार्याने पूर्ण करण्याची संधी मिळाली त्याचे शिक्षकवर्गाने सोन केलं पाहिजे,शिक्षकांनी नवनवीन कौशल्य आत्मसात करून विद्यार्थ्यांना जेवढं ज्ञान देत भावी पिढी घडविण्याचे सत्कार्य करावे असे विचार आपल्या मार्गदर्शनात व्यक्त केले....
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून संस्था सचिव सन्मा.रवींद्रजी जनवार यांनी कोरोनाच्या महामारीत् एकत्रित येण्याच्या परंपरेत खंड पडल्याची खंत व्यक्त करीत आज आपण पुन्हा एकत्रित येवून आपणात नवचैतन्य निर्माण होईल असा आशावाद् व्यक्त केला. याप्रसंगी मंचावर संचालक सौ.वर्षाताई जनवार , सन्मा.सतीशजी रेंगे, प्रमुख अतिथी म्हणून श्री एन. टी. येसनसुरे सर,श्री. प्रतिकजी जनवार,सन्मा. आनंदियाजी गुहा,श्री.राजेशजी डोर्लीकर उपस्थित होते.
एकत्रिकरण सोहळ्याच्या निमित्ताने सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने नवनिर्वाचित संचालक मंडळांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला कर्मवीर विद्या.तथा कनिष्ठ महा.प्राचार्य देविदास चिलबुले सर,कर्मवीर विद्या.तथा कला कनिष्ठ महा.वासाळा प्राचार्य श्री.शेंडे सर,कर्मवीर विद्या.तथा कला कनिष्ठ महा.अमिर्झा प्राचार्य आर.डी. शेंडे सर,तिन्ही विद्यालयाचे पर्यवेक्षक, प्राध्यापकवृंद,शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे यशस्वी संचालन प्रा.प्रधान सर यांनी केले तर उपस्थितांचे आभार विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.इडपाचे सर यांनी मानले.
संस्थासचिव सन्मा.रवीद्र जनवार यांचेकडून आयोजित स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.कार्यक्रमाच्या उत्कृष्ठ नियोजनासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गाने सहकार्य केले



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!