मुसळधार पावसामुळे चिंधी चक येथे ५ घरे पडली.
तळोधी बा:(यश कायरकर)
चिंधीचक येथील श्री तुळशीदास रामकृष्ण जांभुळे यांचा घर पडला व इतर काही घरांची नुकसान झाली.
काल वादळ पाऊसामुळे चिंधीचक व चिंधिमाल या गावातील पाच जणांची घरे पडून नुकसान झाले यामध्ये तुळशीदास जांभुळे, ईश्वर लेनगुरे, अर्जुन सातपैसे चिंधीचक आशिष भाकरे, मुकेश माहुरे यांच्या घरांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाली.
तुळशीदास जांभुळे हा आपल्या घराच्या वरांड्यात एकटाच झोपला असताना घर पडल्यामुळे त्याला किरकोळ जखमा झाल्या.
तरी या शेतकऱ्याला आर्थिक मदत शासन तर्थे मिळावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!