जवाहर नवोदय विद्यालय वर्ग ९ वी करिता प्रवेश परीक्षा 2023-24 दिनांक ११ फेब्रुवारी 2023 ला
तळोधी (बा.);
जवाहर नवोदय विद्यालय सत्र 2023-24 मध्ये वर्ग 9 वी मध्ये प्रवेश घेण्याकरिता प्रवेश परीक्षा दिनांक 11 फेब्रुवारी 2023 ला जवाहर नवोदय विद्यालय तळोधी (बाळापूर) जिल्हा चंद्रपूर येथे होणार आहे. या परीक्षेकरिता ऑनलाइन आवेदन भरण्याची अंतिम तिथी 15 ऑक्टोबर 2022 आहे. ऑनलाइन आवेदन भरण्याकरिता नवोदय विद्यालय समिती ची वेबसाईट www.navodaya.gov.in or www.nvsadmissionclassnine.in ही असुन आवेदन फार्म भरण्यासंबंधी माहिती उपरोक्त वेबसाईट वर दिलेली आहे.
सदर इयत्ता नववीच्या परीक्षेकरिताआवेदन फार्म भरतांना नगर पालिका, नगर पंचायत मध्ये येणाऱ्या शाळांनी ग्रामीण / शहरी काळजीपूर्वक भरावे. तरी संबंधित सर्व विद्यार्थी आणि पालकांनी याची नोंद घ्यावी.
असे नववी परीक्षा करिता फॉर्म भरून इच्छुक विद्यार्थ्यांच्या पालकांना प्राचार्य मीना मनी, जवाहर नवोदय विद्यालय तळोधी (बा.) यांनी सांगितले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!