लोक विद्यालयात अभ्यासतंत्र कार्यशाळा

लोक विद्यालयात अभ्यासतंत्र कार्यशाळा


तळोधी(बा)(यश कायरकर)
      दी रुरल एज्युकेशन सोसायटी ब्रम्हपुरी सन 1960द्वारा संचालीत लोकविद्यालय तळोधी(बा) येथे इयत्ता 8 ते 10 च्या विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या तंत्रावर मार्गदर्शन करण्यात आले.आधुनिक काढात वाढणारी स्पर्धा, भविष्याची चिंता, ताणतणाव, अभ्यासाची मानसिकता, स्मरणशक्ती  विसरणे, आणि स्वयंसुचना अशा विविध टप्प्यावर विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना प्रचंड मानसिक त्रास होतो.विद्यार्थी नियोजनानुसार अभ्यास करीत नाही,त्यामुळे चांगले गुण प्राप्त करण्यासाठी अपयश येते.अशा परीस्थितीला सामोरे जाण्याअगोदरच विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे नियोजन करावे.योग्य पद्धतीने नियोजन करुन अभ्यास करण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात विद्यालयात करण्यात आले होते.
   विद्यार्थ्यांनी अभ्यास करतांना एकाग्रता , आत्मविश्वास, सकारात्मक दुष्टीकोन,वेळेचे व्यवस्थापन, तणावाचे नियोजन,शिथिलीकरण, स्वयंसुचना ,स्मरणात ठेवण्यासाठी विविध क्लुप्त्या, बिंदूत्राटक, ज्योतीत्राटक पध्दती, सकारात्मक सहवास, व्यायाम व सकस आहार इत्यादी विषयावर पदवीधर शिक्षक संतोष नन्नावार यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक श्री.ए.वाय.बांगरे ,जेष्ठ शिक्षक पि.यु.गिरडकर, विद्यार्थी,पालक व शिक्षकांनी सहकार्य केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!