शालेय वेळेत बस नसल्याने विद्यार्थ्यांची शैक्षणिक नुकसान
शालेय वेळेत बस नसल्याने विद्यार्थ्यांची शैक्षणिक नुकसान
मूल शहरात मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात मात्र या विद्यार्थ्यांना शालेय वेळेत बस मिळत नसल्याने मोठा आर्थिक व शैक्षणिक नुकसान सहन करावे लागत आहे.
मानव विकास मिशन कडून एस. टी. महामंडळाला दर महिन्याला लाखो रुपये या विद्यार्थ्यांच्या प्रवासाकरिता दिले जाते. करोडो रुपये निधी एसटी महामंडळाला मानव विकास मिशन एसटी बसेस खरेदी करण्याकरिता दिलेले आहेत. मात्र विद्यार्थ्याकरिता खरेदी केलेल्या बस एस टी महामंडळ स्वतःचे प्रवासी वाहतूक करिता वापर करीत असून विद्यार्थ्यांना मात्र वाऱ्यावर सोडले आहे.
मूल शहरातील सकाळ पाळीतील शाळा सकाळी सात वाजता भरतात. प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन शाळांचा समावेश आहे. हे विद्यार्थी दुपारी बारापर्यंत घरी जाऊ शकतात मात्र पोंभूर्णा मार्गे दुपारी बारा वाजताची बस बंद झाल्याने, या विद्यार्थ्यांना चार वाजेपर्यंत बस स्थानकावर बसेसची वाट पहावी लागत आहे. अशीच परिस्थिती चिचाळा मार्गाची आहे.
बेंबाळ मार्गे सकाळी आठ वाजताचे पूर्वी बस येत नसल्याने, या मार्गावरील प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे दोन तासिका वाया जात आहेत.
शालेय वेळेत बसेस सुरू करावी अशी मागणी विद्यार्थी पालक आणि शिक्षकांनी केली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!