कॉलेज व शाळेतील विद्यार्थ्यांसाठी लवकरात लवकर सकाळी 6 गोंडपिंपरी ते मुल ,सायंकाळी मूल ते गोंडपिपरी 5:30 वाजताnबस सेवा सुरू करा....
प्रतिनिधी:- कुमुदिनी भोयर
युवा क्रांती संघटना व शालेय विद्यार्थ्यांची मागणी
गोंडपिपरी मूल मार्गावर जाणाऱ्या बसफेऱ्या कमी असल्यामुळे या मार्गावरील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. बोरचादंली, राजगड, चांदापूर , जुना सुरला, नवेगाव ग्रामीण भागातील विद्यार्थी कर्मवीर कॉलेज मुल येथे शिक्षण घेत आहे .कॉलेज व डिग्री कॉलेज येथे शिक्षण घेण्यासाठी नियमीत प्रवास करीत आहे.विद्यार्थी शिक्षणापासून वंचित रहात आहेत.शिक्षणापासून विद्यार्थी वंचित राहू नयेत, यासाठी महामंडळाने बस सेवा द्यावी.
विद्यार्थी व दिव्यांगाची वयोवृद्धांची गोरगरीब शेतकरी शेत मजुरांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. नव तरुणी विद्यार्थिनी महिला यांना कॉलेजसाठी,शाळेसाठी व अन्य कामासाठी तालुक्याच्या ठिकाणी व ग्रामीण भागातील मोठ्या गावाच्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी कोणाला, तरी खासगी गाडीला हात करून मदत मागावी लागते.
अशा परिस्थितीत कोणत्याही विद्यार्थिनी किंवा महिलेवर कोणतीही अभद्र वेळ येऊ नये, यासाठी महामंडळाने लक्ष घालावे.बस सेवा उपलब्ध झाल्यास विद्यार्थ्यांना व नजदीक च्या गावांना सुद्धा त्याचा लाभ होईल. तसेच महामंडळाला नियमित भाडेही मिळेल.जर येत्या काही दिवसापर्यंत मूल -गोंडपिपरी एसटि बस सेवा चालु नाही झाली तर कॉलेजमधील ,शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन मोठे अंदोलन केले जाईल असा इशारा निवेदना मार्फत देत आहोत.ग्रामीण भागातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता आगारकडून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही या दृष्टीने लवकरात लवकर एसटी बस सेवा सुरु करा.
वरील मागणीची तात्काळ दखल घेऊन बससेवा सुरू करावी अन्यथा युवा क्रांती संघटना तीव्र आंदोलन करणार असा इशारा निवेदनामार्फत देण्यात आला. *निवेदन देताना युवा क्रांती संघटनेचे अध्यक्ष निखिल वाढई, प्रणित पाल, आकाश येसनकर, निहाल गेडाम, साहिल खोब्रागडे, सुरज गेडाम,दिक्षा शेरकी,सनोनी शेरकी,पायल निशाणे,सलोनी,अक्षरा गुलभभवार, साक्षी नाहामकार,राखी राऊत,टिकल मेश्राम, प्राची पंधरे,प्रणाली चुदरी,शितल नागापूरे आदि उपस्थित होते .



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!