लढा
लढा
चला चला ओ एकजुठीने
लढा आपण उभारू,
रेल्वे मालधक्क्यास
विरोध करू,विरोध करू....!!धृ!!
स्वच्छ सुंदर मूल आमचे
नाही कोणाच्या बापाचे
सुरक्षा राखण्या सज्ज होवू
निर्धार पक्का करू,
चला चला ओ......!!1!!
माता भगिनी बाल बच्चे
वृदध आमचे सगे सोयरे,
शाळेत जाती हसरे गोबरे
का उठता जीवावर त्यांच्या
पर्यावरण वाचवू,
चला चला ओ ......!!2!!
शुदध हवेशी खेळती सारे
पर्यावरणाशी नाते अमूचे
वन्यजीवांचा संचार इथे हा
वृक्ष वेली हिरवी झाडे
प्रदुषण दूर सारू,
चला चला ओ............!!3!!
*श्री.विनायक रेकलवार,मूल*



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!