नवभारत विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचे स्नेहमिलन
नवभारत शाळेतील माजी विद्यार्थी विद्यार्थिनी तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन
आपण ज्या शाळेत इयत्ता 10 वी पर्यंतचे शिक्षण घेतले त्या शाळेप्रती कृतज्ञता भाव व्यक्त करता यावा गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करावे या उद्देशाने प्रेरित होऊन नवभारत शाळेत इयत्ता 10 वी पर्यंतचे शिक्षण घेऊन 1992 मध्ये 10 विची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या नवभारत शाळेतील माजी विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी सन
2021- 22 या शैक्षणिक सत्रात गुणवत्ता यादीत अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी साठी सत्कार सोहळ्याचे आयोजन दिनांक 17.09.2022 रोज शनिवारला ठीक 3.30 वाजता नवभारत विद्यालय,मूल येथील प्रांगणात बक्षीस वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रंगी कार्यक्रमाचे अध्यक्षिय स्थान नवभारत कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य
मान. अशोक झाडे सर,बक्षीस वितरकाचे स्थान नवभारत कन्या विद्यालय मूल येथील मुख्याध्यापिका मान. मंगला सुंकरवार मॅडम यांनी,तर प्रमुख अतिथीचे स्थान नवभारत विद्यालय मूल येथील ज्येष्ठ शिक्षक रमेश डांगरे सर,ऋषिदेव चौधरी सर, ऋषिजी मुंडरे सर तसेच उपस्थित शिक्षकांनी स्वीकारले.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते 1)संस्कार राकेश पेददुरवार प्रथम क्रमांक
2) अथर्व सुनील लाभे द्वितीय क्रमांक.(नवभारत विद्यालय मूल (मुले)
1)आस्था प्रमोद सहारे प्रथम क्रमांक
2) नंदिनी बंडू भोयर
द्वितीय क्रमांक (नवभारत कन्या विद्यालय मूल) या विद्यार्थ्यांना प्रत्यकी ₹4000 आणि ₹2000 रोख तसेच स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.या प्रसंगी त्यांच्या पालकांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनातून या माजी विद्यार्थ्यांपासून प्रेरणा घ्यावी आणि जीवनात यशाचे शिखर गाठावे असे मौलिक मार्गदर्शन केले.
या सोहळ्याला दोन्ही शाळेतील नववी आणि दहावीच्या इयत्तेतील 190 विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन बल्लावार यांनी,प्रास्ताविक मनीषा भालेराव यांनी तर विद्यार्थ्यांना दहावी नंतर ची दिशा ठरविण्यासाठी करिअर गाईडन्स वर्धा येथील माजी विद्यार्थिनी अभियंता स्मिता नाकतोडे यांनी तर आभार प्रदर्शन हितेंद्र कोकाटे यांनी केले. या सोहळ्याला माजी विद्यार्थी विद्यार्थिनी म्हणून अनिल येत्ते,अभय पेदपल्लिवार,मनीष शर्मा,नितीन तहलियानी,नितेश चिलके,गुणाजी वाढई,प्रशांत नंदीग्रामवार,धर्मा सुत्रपवार,प्रमोद सहारे,सतीश राजुरवार,संदिप धाबेकर,प्रविण झुरमुरे, किरण लोनबले,स्मिता एकरे,संगीता चौधरी,अर्चना गाडेवार,अर्चना नखाते यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यात नवभारत शाळेत कार्यरत ज्येष्ठ शिक्षक मान. एकनाथ गुंडोजवार सर,तसेच सर्व शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!