कोरोना काळापासून बंद असलेली अर्जुनी तुकुम येथील बस सुरू करा....
शेगाव...जगदीश पेंदाम
वरोरा तालुक्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोर लगत येत असलेलं अर्जुनी तुकुम गावाची लोकसंख्या दोन हजार असुन विद्यार्थ्यांना शिक्षणा करीता तालुक्याच्या वरोरा या ठिकाणी जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहे असल्याने मागील तीन वर्षापासून कोरोना काळापासून बंद असलेली बस सुरू करण्याची मागणी गावातील शालेय विद्यार्थी, नागरिकांनी लोक प्रतिनिधी तसेच प्रशासनाला केली आहे....
सविस्तर असे की वरोरा डेपोची बस वरोरा,शेगाव, चारगाव, अर्जुनी तुकुम,कोकेवाडा येथे तीन वर्ष अगोदर सकाळी तसेच सायंकाळी सुरू करण्यात आली होती, परंतु कोरोना काळापासून ही बस बंद करण्यात आल्यानंतर ही बस अजून पर्यंत सुरू करण्यात आली नसल्याने चारगाव, अर्जुनी तुकुम, कोकेवाडा, गावातील शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी, नागरिक महिलांना यांना तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे..
या गावातील बहुतांशी विद्यार्थी हे शिक्षणाकरीता वरोरा तालुक्याच्या ठिकाणी दररोज जात असतात मात्र त्यांना साधनच मिळत नसल्यामुळे काही विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे...
एकीकडे सरकारने आजादी का 75 अमृत महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला परंतु 75 वर्षानंतरही ग्रामीण भागामध्ये आजही सुविधांचा अभाव दिसत असल्यामुळे जनतेला विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरं जावं लागतं आहे ही गावे ताडोबा व्या व्याघ्र प्रकल्प लगत असलेल्यामुळे नेहमीच वन्य प्राण्यांच्या वावर असतो, एखाद्या वेळी पायदळ येणाऱ्या नागरिकांना, विद्यार्थ्यांना रात्रीच्या सुमारास वन्य प्राण्यांपासून जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली असुन वरोरा डेपोची बस शेगाव, चारगाव, अर्जुनी तुकुम, कोकेवाडा बस सुरू करण्याची मागणी अर्जुनी तुकुम,गावातील विद्यार्थी, नागरिकाकडून लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनाला करण्यात येत आहे.....



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!