महाआघाडीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे आवाहन
रचनात्मक कामगिरी व सामाजिक न्यायाची" भूमिका घेऊन काम करणाऱ्या 'शिक्षक महाआघाडी'च्या उमेदवारांना निवडून द्या
4 सप्टेंबर 2022 ला गोंडवाना विद्यापीठ 'सिनेट'ची निवडणूक होऊ घातली आहे.
या नििवडणुकीत यंग टीचर्स असोसिएशन, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ,नुटा,विजूकटा, गोंडवाना शिक्षक संघटना, डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद,महाराष्ट्र व्होकेशनल टीचर्स असोसिएशन समर्थीत "शिक्षक महाआघाडी" च्या वतीने पदवीधर मतदार संघात खालील उमेदवार उभे केले आहेत.
सर्वसाधारण(OPEN) मतदार संघ' यात पाच उमेदवार निवडून द्यावयाचे आहेत. अॅड. भेंडारकर गोविंद बाबुराव, चौधरी दिलीप बाबुराव, जुमडे चंद्रशेखर महादेवराव, कुत्तरमारे विजय सूर्यभान, लोंढे अजय भाऊरावजी तर राखीव गटातून एस.सी गटातून धोपटे दीपक बापूराव, एस टी गटातून आत्राम तनुश्री धर्मरावबाबा, ए न टी गटातून कन्नमवार राजेंद्र देवराव, ओबीसी गटातून शेरकी सुनील सीताराम, महिला गटातून, शिंदे विद्या अनिल यांना निवडून देण्याचे आवाहन सुधाकर अडबाले सरकार्यवाह विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ यांचे नेतृत्वाखालील शिक्षक महाघाडीच्या वतीने केले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!