लिंक फेल मुळे पोस्टातील व्यवहार बंद,खातेदार व नागरिकांना होतोय त्रास

लिंक फेल मुळे पोस्टातील व्यवहार बंद,खातेदार व नागरिकांना होतोय त्रास

तळोधी बा.;
        अप्पर तहसील कार्यालय तळोधी बा अंतर्गत येत असलेल्या पोस्ट ऑफिस मधील लिंक गेल्या काही दिवसांपासून बंद असल्याने पोस्टातील सर्व व्यवहार गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत. त्याचा फटका खातेदार व सामान्य नागरिकांना होत आहे.

               तळोधी बा येथील पोस्ट ऑफिस मध्ये अनेक ग्राहकांचे खाते आहेत,मोठ्या प्रमाणावर पैशाचे व्यवहार या ठिकाणी होत असतात, तसेच आधार कार्ड केंद्र पोस्टात असल्याने आजूबाजूच्या गावातील लोक या ठिकाणी नवीन आधार कार्ड किंवा मोबाईल नंबर लिंक करणे, आधार कार्ड अपडेट करणे अशी कामे या ठिकाणी केली जातात मात्र अनेक दिवसापासून लिंक नसल्याने सर्व कामे ठप्प पडली आहेत. 

                शासनाच्या अनेक योजना पोस्ट ऑफिस द्वारे राबविल्या जातात मात्र लिंक फेल असल्याने नागरिकांना त्याचा फटका बसतो. आधार कार्डचे अनेक कामे घेऊन आजूबाजूच्या गावातील नागरिक आल्या पावली परत जातात.

             संबंधित विभागाने पोस्टाची लिंक लवकरात लवकर व्यवस्थित करून सर्व कामे सुरळीत सुरू करण्याची मागणी नागरीकांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!