मूलचे गांधी चौक म्हणजे, मरणाला आमंत्रण

मूलचे गांधी चौक म्हणजे, मरणाला आमंत्रण

अनियंत्रित वाहने 

मूल शहरातील मध्यवर्ती आणि वर्दळीचे ठिकाण म्हणजे गांधी चौक.  गांधी चौक म्हणजे आता मूल वासीयांना मरणाचे आमंत्रण देणारे स्थळ झाले काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

गांधी चौक हे गडचिरोली-चंद्रपूर-नागपूर राष्ट्रिय महामार्गावरील मूल शहरातील वर्दळीचे ठिकाण आता धोकादायक ठिकाण बनले आहे.

या चौकातून चंद्रपूरकडे, विश्रामगृहकडे, सोमनाथ रोड, नागपूर मार्गे भरधाव वेगाने शेकडो दुचाकी-चारचाकी वाहने धावत असतात.  मूल येथील नवभारत विद्यालय, नवभारत कन्या विद्यालय, नवभारत कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थ्यांनाही हाच चौक ओंलाडून जावे लागत असते.  या सर्वांच्या सुरक्षेकरीता लावण्यांत आलेले ट्राफिक सिग्नल मागील काही महिण्यांपासून बंद असल्यांने किंवा ते काही बड्या व्यापार्‍यांच्या हितासाठी बंद ठेवण्यात  आल्यांने, कोणत्याही क्षणी मोठा अपघात होण्यांची भिती आहे.  चारही बाजूने भरधाव येणार्‍या वाहनांना कोणताही प्रतिबंध आता राहीलेला नाही.  पूर्वी मूल पोलिसांचे वाहतूक पोलिस हे मध्यवर्ती भागात राहून, व्हिसल (शिट्टी) आणि हाताचे इशारे  करून ‘ट्राफिक कंट्रोल’ करीत होते.  आता सर्व काम हे ‘भगवान भरोसे’ झाले आहे.  मूलच्या नागरीकांस, लहान विद्यार्थ्यांना रस्त्यांचे चारही बाजूने गोंधळलेल्या स्थितीत वाहनांचा अंदाज घेत, धावत-पळत चौक क्राॅस करावे लागत आहे.  मूल पोलिस स्टेशनचे वाहतूक पोलिस हे कुठेतरी, एखाद्या दुकानासमोर (शक्यतो फोटो फ्रेमिंगचे दुकानासमोर, स्टुलवर) बसून असतात. सध्या या चौकातून जाणे म्हणजे, ‘आपला जीव, आपली जबाबदारी’ बनली आहे.

गांधी चौकात,  सिग्नल लावण्यात आले, त्यावेळी अनेकांनी या कामाचे श्रेय घेण्यांसाठी धळपळ करीत होते.  बंद सिंग्नलबाबत ते आता गप्प का? असा प्रश्नही आता निर्माण झाला आहे. 

हे सिग्नल लावल्यामुळे विज बिलाचा प्रश्न निर्माण होवून, हे सिग्नल बंद पडू नये म्हणून सोलर सिस्टमद्वारे हे सिग्नल लावण्यात आले. मात्र हे सिग्नल का बंद पडले आहे? यावर आता कुणीही बोलत नाही.  मिळालेल्या माहितीनुसार, हे सिग्नलचे व्यवस्थापन मूल नगर परिषदेचे आहे. मूल नगर परिषदेकडून हजारो नागरीकांच्या जीवांचा प्रश्न असलेल्या सिग्नलचे व्यवस्थापन का होवू शकत नाही? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

याबाबत माहिती काढली असता, सिग्नल मुळे गांधी चौकातील ‘काही’ व्यापार्‍यांचा ‘बिझीनेस’ कमी झाला होता.  त्यामुळे, काही ‘अर्थ व्यवहार’ करून हे सिग्नल जाणीवपूर्वक बंद पाडण्यात आले.  ही बाब खरी असेल, तर गंभीर आहे.  मूल नगर परिषदेत रूजू झालेले कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी अजय पाटणकर यांचेकडून गांधी चौकातील सिग्नलचा प्रश्न सुटेल अशी अपेक्षा आहे.


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!