मूल तालुक्यातील रेती घाटांचा नियमबाह्य पद्धतीने उपसा सुरू
मूल : - मूल तालुक्यातील रेती घाटांचा लिलाव झाल्यानंतर संबंधित तहसीलदार साहेबांकडून कच्चा ताबा मिडाल्यानंतर अटी शर्यतीनुसार उप अधीक्षक भूमी अभिलेख मूल यांच्याकडून रेती घाटाची मोजणी करून 'क' प्रत प्रशासनाकडे सादर झाली नाही तरी घाटातून रेती उत्कलन करून रेतीची साठवणूक व विक्री केली गेली आहे ही रेती साठवणूक व विक्री वैध की अवैध याची योग्य चौकशी करून कारवाही करण्यात यावी अशी युवा क्रांती संघटना,मूल तर्फे मागणी करण्यात आली. मूल तालुक्यातील रेती घाटांचा लिलाव झाल्यानंतर घाटधारकांना संबंधित तहसीलदार साहेबांकडून रेती उत्खननासाठी रेती घाटांचा कच्चा ताबा मिळाल्यानंतर रेती घाटधारक हे रेती उत्खनन सुरु केल्या नंतर एका महीन्याच्या आत घाटाची रितसर उप अधीक्षक भूमीअभिलेख मूल मधून मोजणी करून 'क' प्रत शासनाकडे सादर वाला पाहिजे होते पण असे न होता रेती घाटधारकांनी शासनाची दिशाभूल करून रेती उत्खननाची अंतिम तारीख गेल्यानंतर पण रेती घाटाची कुठल्याही प्रकारची मोजणी करून 'क' प्रत शासनाकडे सादर झाली नाही रेती उत्खनन कालावधी 10 जून पर्यत असतो ,परन्तु उत्खनन कालावधी सम्पून सुद्धा मोजनी झालेली नाही यांचा अर्थ असा की किती मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन झाले असेल रेती उत ठरविलेल्या ब्रास मर्यादे पेक्षा 20 ते 30 पट करून रेतीची साठवणूक केली आणि विक्री केली ही रेती साठवणूक विक्री वैध कि अवैध यावर नियमानुसार चौकशी करून दंडात्मक कारवाही करण्यात यावी. निवेदन देताना युवा क्रांती संघटनेचे अध्यक्ष निखिल वाढई, आकाश येसनकर, निहाल गेडाम आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!