पुलाची उंची वाढवण्याची परिसरातील नागरिकांची मागणी
दोन महिन्यात दहाव्या पुर...
शालेय विद्यार्थी, गरोदर माता विरुद्ध नागरिक यांना पावसाळ्यात सुविधा उपलब्ध होत नसल्याने राहावे लागते वंचित...
शेगाव.. जगदीश पेंदाम
वरोरा तालुक्यातील अर्जुनी तुकुम कोकेवाड धानोली,दादापुर तसेच परिसरातील शालेय विद्यार्थी, गरोदर माता शेतकरी, शेतमजूर वृद्ध नागरिकांना आपला जीव मोठे ठेवून प्रवास करावा लागत असल्यामुळे पुलाची उंची वाढवण्याची मागणी वारंवार करण्यात येत आहे..
मागणी दोन महिन्यांत सतत सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन सगळीकडे विस्कळीत झाले असून नदी नाले मोठ्या प्रमाणात भरून वाहत असतांना आज आलेल्या पावसाने ओढ लागली आहेत त्यातच अर्जुनी तुकुम, कोकेवाडा, चारगाव,दादापुर, धानोली या गावातील शेतकऱ्यांना, शालेय विद्यार्थी, गरोदर माता, वृद्ध नागरिक यांना शिक्षण, दवाखाना, दळणवळणाच्या कामासाठी शेगाव तसेच तालुक्यात वरोरा या ठिकाणी जावे लागत असल्याने पावसाळ्यात येणाऱ्या पाण्यामुळे अर्जुनी तुकुम, चारगाव इरही नाल्याचा पूलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्यामुळे नागरिकांना आपल्या जीव मुठीत ठेवून प्रवास करावा लागत आहे..
एकीकडे भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असून ग्रामीण भागाची जनतेला आज ही आरोग्य, वाहतूक, रस्ता, शिक्षण,तसेच इतर सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे, त्यामुळे लोकप्रतिनिधी, शासनाने लक्ष देऊन या पुलाची उंची वाढण्याची मागणी नागरिकाकडून करण्यात येत आहे...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!