मुल भाजपातर्फे समूहनृत्य स्पर्धा संपन्न
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी मूल तालुका आणि भारतीय जनता पार्टी मूल शहर यांच्यावतीने कन्नमवार सभागृह येथे समूह नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या समूह नृत्य स्पर्धेमध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
यावेळी उपस्थित माजी नगराध्यक्ष रत्नमाला भोयर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. स्पर्धेत सहभागी ना प्रमाणपत्र तसेच विजेता स्पर्धकांना सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी भाजपचे संपूर्ण कार्यकर्ते उपस्थित होते. समूह नृत्य बघण्याकरिता मूल शहरातील अनेकांनी सांगलीच गर्दी केली होती. 'वंदे मातरम' तसेच 'भारत माता की जय' या नाऱ्यांनी संपूर्ण हाल दणाणला होता. यावेळी उपस्थित भाजपा शहर प्रमुख प्रभाकर भोयर, चंद्रकांत आष्टनकर, अजय गोगुलवार तसेच समस्त भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.सूत्रसंचालन सचिन बोर्डावार, संजीवनी वाघरे यांनी केले. प्राथमिक अ गट, माध्यमिक ब गट, कनिष्ठ महाविद्यालय क गट यानुसार विद्यार्थ्यांसाठी देशभक्ती पर समुहनृत्य घेण्यात आले, प्रथम,द्वितीय, तृतीय असे गुणानुक्रमानुसार मान्यवरांच्या हस्ते मोमेन्टोज ,प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला. बालविकास शाळा, नवभारत शाळा, बल्लारपूर पब्लिक शाळा, स्वामी विवेकानंद विद्यामंदीर ,माऊन्ट काॅन्वेट, सेंट अॅन्स सी बिल एस सी स्कूल ,प्रियदर्शनी इंदिरा गांधी शाळा, शाळांनी देशभक्ती पर समूह नृत्याचे प्रस्तुतीकरण केले.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!