श्रीकृष्ण जन्माष्टमी ची चार पिढीची परंपरा अविरत सुरू...
लाकडे परिवाराची कानोबा स्थापन करण्याची चौथी पिढी
शेगाव..... जगदीश पेंदाम
वरोरा शहरातील बोर्डा येथील समाजसेवक वृक्षप्रेमी व रुग्णमित्र धीरज लाकडे यांचीही चौथी पिढी आजही श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त कान्होबा स्थापित करून गोकुळ अष्टमी दरवर्षी साजरी केली जाते यावर्षी सुद्धा लाकडे परिवारातील धीरज लाकडे या तरुण युवकांनी कान्होबा स्थापित करण्याची परंपरा अविरत सुरू ठेवलेली आहे व श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त उत्कृष्ट देखावे स्थापित करून येणाऱ्या पाहुण्यांचे डोळ्याचे पारने फेडले..
धीरज लाकडे हे समाजसेवक असून समाज उपयोगी उपक्रम सदैव राबवित असतात वृक्ष लागवडी तसेच रुग्ण मित्र म्हणून त्यांची वरोरा शहरात ओळख आहे जनसामान्यात दांडगा परिचय असल्यामुळे श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव यांच्या राहते घरी मोठ्या थाटात साजरी केली जाते धीरज लाकडे यांचे वडील गजानन लाकडे हे हिरालाल लोया विद्यालयातील कर्मचारी असून ते तीन भाऊ आहेत. तिघेही भाऊ मिळुन गोकुळ अष्टमीचा उत्सव एकत्रित येऊन मोठ्या थाटात उत्सव साजरा करतात कानोबा स्थापनेपासून तर विसर्जनापर्यंत वार्डात नागरिकांची चांगलीच मांदियाळी असते दहीहंडी, काला भजन कीर्तन व महाप्रसादाचा भव्य दिव्य कार्यक्रमही आयोजित केला जातो या उत्सवाला येणारा खर्च लाकडे परिवार स्वखर्चाने करीत असून कोणाचीही मदत घेत नाही तर पंजोबा काळापासून सुरू असलेल्या श्रीकृष्ण जयंतीच्या उत्सव दरवर्षी वेगवेगळे देखावे स्थापित करून उत्सवाला साजरे करतात असल्यामुळे लाकडे परिवाराचा वरोरा शहरात चांगला चर्चेचा असून परिवारातील चौथी पिढी आजही अविरतपणे उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करतात.....



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!