सिन्देवाही येथे कॉंग्रेस कार्यालयात सदभावना दिवस साजरा

सिन्देवाही येथे कॉंग्रेस कार्यालयात सदभावना दिवस साजरा

सिन्देवाही (प्रतिनिधी) 

 20 ऑगस्ट 2022 भारताचे दिवंगत पंतप्रधान  राजीव गांधी यांचा जयंतीदिवस, आज दिनांक 20 ऑगस्ट सम्पूर्ण भारतामध्ये शहिद दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचा जयंती दिवस  सदभावना दिन म्हणून साजरा केल्या जातो, याच दिनांकास 20/ 08 / ला राजीवजी गांधी याना "मरणोपरांत सदभावना पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती आणि दिवंगत राजीव गांधी यांचा सदभावना पुरस्कार देवून गौरव करण्यात आलेला होता मरणोपरांत "सदभावना पुरस्कार गांधी कुटुम्बियाना तत्कालीन "भारत सरकार" तर्फे देण्यात येवून यापुढे 20 ऑगस्ट हा दिवस संपूर्ण भारतात सदभावना दिन म्हणून सुद्धा साजरा करण्यात येईल असे घोषित करण्यात आले होते..*
*तेव्हा पासून 20 ऑगस्ट हा दिवस "राजीवजी गांधी" यांचा जयंती दिवस आणि सदभावना दिन म्हणून सम्पूर्ण राष्ट्रामध्ये साजरा करण्यात येतो आहे,  सिंदेवाहि तालुका कांग्रेस कमेटी सिंदेवाहि च्या कार्यालयामध्ये  "दिवंगत पंतप्रधान राजीवजी गांधी यांना "आदरांजली" वाहून "ज्येष्ठ कांग्रेसचे मार्गदर्शक तथा सेवानिवृत्त शिक्षक  मणिकराव बनकर यांच्या हस्ते पुष्प अर्पण करुण "भावपूर्ण आदरणजली वाहिली आणि सदभावना दिवस म्हणून आठवन करण्यात आली यावेळी तालुका कांग्रेस कमेटीचे अध्यक्ष रमकांत लोधे,सुनील उट्टलवार   अध्यक्ष शहर कांग्रेस कमेटी, युनुसभाई शेख ज्येष्ठ नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ता, भास्कर नन्नावार सभापती बांधकाम विभाग, दिलीप रामटेके सभापती जलनिस्सारण विभाग, तालुका महिला कांग्रेस च्या उपाध्यक्ष  निमंत्रिता कोकोडे जयश्री स्वप्निल कावळे, माजी नगराध्यक्ष आशा गंडाटे, पुष्पा शीडाम, कार्यालयीन सहाय्यक मोरेश्वर द्यानवाडकर, दर्शन निकोडे, इत्यादि उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!