विना नंबर च्या ट्रॅक्टर द्वारे रेतीची मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरु पोलीस प्रशासन झोपेत
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - चिमुर तालुक्यातील उसेगाव ग्राम पंचायत येथील हद्दीत येत असलेल्या उमा नदी लगत १ वर्षांपासून अवैध रेती साठा डंप केलेला असून त्याचा लिलाव करून त्याची परत वाहतूक करून नियमानुसार वाहतूकिची परवानगी द्यायला हवी होती त्यामध्ये वेळ सुद्धा नमूद करायला हवी असे न करता वाहतुकीची परवानगी दिल्या गेली.याबाबत उप विभागीय पोलीस अधिकारी यांना माहिती दिली असता नंबर नसलेल्या ट्रॅक्टर द्वारे सुद्धा वाहतूक करता येते असे मोबाईल च्या माध्यमातून बोलले असून तुम्ही तहसीलदार यांच्याशी संपर्क साधावा असे उलट उत्तर दिले. यावरून असे सिद्ध होते कि पत्रकाराने दिलेली माहिती सत्य असून कारवाई नाही तर सर्वसामान्य जनतेचे काय ? याकडे जिल्हाधिकारी यांनी जातीने लक्ष देऊन अधिकाऱ्यांना योग्य ती चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश दयावे अशी जनसामान्य नागरिकांची मागणी आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!