तरुणाने विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या...
शेगाव (जगदीश पेंदाम)
येथील तरुण मनोज रमेश निमजे वय वर्ष 35 आज सकाळी शेगाव येथील पिण्याच्या पाण्याच्या विहिरीमध्ये मृत अवस्थेत आढळून आले आहे..
सदर युवक हा शेगाव येथील रहिवासी असून कॅनडा बँक मध्ये नोकरीला होता पण मागील तीन वर्षापासून सदर युवक नोकरी सोडून गावातच वास्तव्याला होता काल रात्री अचानक तो घरून निघून गेल्याने घरच्यांनी इतरत्र शोधा शोध सुरू केली परंतु त्याचा काही पत्ता लागला नाही अखेर आज सकाळी घराजवळून काही अंतरावर असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरीमध्ये प्रेत नागरिकांना तरंगताना दिसले असता घटनेची माहिती शेगाव येथील पोलीस यांना मिळताच पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले सदर इसमास पाण्यातून बाहेर काढण्यात आले सदर इसम हा मनोज असल्याची खात्री झाल्यानंतर मोक्का पंचनामा करून बॉडीला शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे पाठवण्यात आले आहे आत्महत्येचे नेमके कारण कळले नसून घटनेचा पुढील तपास शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार अविनाश मेश्राम यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी करीत आहे..



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!