मांत्रिक, बुवा-बाबांच्या आहारी जाऊ नका!" अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षीका यांचे स्नेहमेळाव्यात 'हरिभाऊ पाथोडे' यांचे आवाहन

मांत्रिक, बुवा-बाबांच्या आहारी जाऊ नका!" अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षीका यांचे स्नेहमेळाव्यात 'हरिभाऊ पाथोडे' यांचे आवाहन.


नागभीड;
 नागभीड येथील रुक्मिणी सभागृहात आयोजित  बाल विकास प्रकल्प अधिकारी राजेंद्र ठोंबरे यांचे सेवापुर्ती निमित्ताने, अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षीका यांचे स्नेहमेळाव्यात पाथोडे यांनी बाबा-बुवा, मांत्रिक करीत असलेले तथाकथित चमत्कार करून दाखवले आणि त्यामागील विज्ञान समजावून सांगितले. 
           "जय जवान, जय किसान, जय विज्ञान आणि आता जय अनुसंधान अशाप्रकारच्या घोषणा देऊन प्रगती साधत आहोत. तरीही वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी प्रयत्न करीत नाही. वैज्ञानिक प्रक्रिया जीवनाचा अविभाज्य भाग बनवित नाही. अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. बाबा-बुवा, मांत्रिकाचा हैदोस ग्रामीण भागासोबतच शहरी भागातही सुरू आहे. अशा पाखंडी बाबा-मांत्रिकाचे आहारी जाऊ नका." असे आवाहन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य संघटक हरिभाऊ पाथोडे यांनी केले.
        बाल विकास प्रकल्प अधिकारी राजेंद्र ठोंबरे यांचे सेवापुर्ती निमित्ताने आयोजित अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षीका यांचे स्नेहमेळाव्यात ते बोलत होते. यानंतर भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमात उत्तम कार्य केल्याबद्दल सर्व अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षीका यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
            यावेळी संवर्ग विकास अधिकारी प्रणाली खोचरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मडावी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!