आझादी का महोत्सव अंतर्गत फेरीचे आयोजन

आझादी का महोत्सव अंतर्गत फेरीचे आयोजन


तळोधी बा.;
        नागभीड तालुक्यातील कोजबी(चक) येथील सरस्वती विद्यालयातर्फे आझादी का महोत्सव उपक्रमांतर्गत गावफेरीचे आयोजन नुकतेच करण्यात आले.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त राष्ट्रीय ध्वज तिरंग्याचा अभिमान जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी तसेच हर घर तिरंगा ही संकल्पना रुजविण्यासाठी सरस्वती विद्यालय तथा पोलिस स्टेशन तळोधी (बा.) यांच्या संयुक्त विद्यमाने सदर गावफेरीचे आयोजन करण्यात आले. 
घरोघरी तिरंगा फडकतो, शौर्याचे गीत गातो, तिरंगा माझा अभिमान, त्यासाठी मी देईन प्राण, एकच अमुचा नारा, हर घर तिरंगा, देश माझा मी देशाचा, तिरंगा अमुचा अभिमानाचा आदी घोषवाक्यांसह जनजागृती करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक दिनकर शेंडे, मुख्याध्यापक दीपक बोकडे व इतर कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!